गट ग्राम पंचायत येणोली (माल) येथे विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न
चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
सचिन वाघे मो.9673757006
आज दि.२१.८.२०२१ ला गट ग्राम पंचायत येणोली माल अंतर्गत धामणगांव (चक) येथील शुद्ध पिण्याचे पाण्याचे फिल्टर,जि.प.शाळा सोलर लावणे ,नाली बांधकाम ,व धामणगांव (माल) येथील अंगणवाडी बांधकाम व सौर नळ ,व येणोली (माल )येथील मागासवर्गीय वस्ती मध्ये बगीचा बांधकाम व बिरसा मुंडा स्मारक पूजन या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिषभाऊ वारजूकर, पंचायत समिती सभापती नागभीड प्रफुलभाऊ खापर्डे,जि.प.सदस्य खोजरामजी मरसकोल्हे ,पं. स.सदस्य सुषमाताई खामदेवे ,होमराजभाऊ लांजेवार जिल्हा अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ चंद्रपूर ,ग्राम पंचायत सरपंच अमोलभाऊ बावनकर,ग्राम पंचायत उपसरपंच सौ.अर्चनाताई मेश्राम,ग्राम पंचायत सदस्य महादेव इंदूरकर,ग्राम पंचायत सदस्य राजूजी झोडे, सौ.वर्षाताई सोनवाने, सौ.ज्योतिताई मेश्राम,सौ.संगीताताई घुगुस्कुर, ग्राम सेवक धोतरे साहेब,ग्राम पंचायत सरपंच सोनापूर ठोबरेताई डॉ.गिरडकर साहेब,मुख्याध्यापक धोंगडे सर,संजयजी अगडे,प्रभाकरजी गेडाम,मंगेश मडावी,विठोबाजी उईके,पुंडलिकजी उईके,गोविंदाजी मडावी,हंसराज बारसागडे, अक्षय मेश्राम,नंदकिशोर रामटेके,व ग्राम पंचायत कर्मचारी वृंद व गावकरी उपस्थित होते,