गडचिरोली तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा,,
आमदार डॉ देवरावजी होळी
भाजपा तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी दिले निवेदन,
संदीप कांबळे
गडचिरोली शहर प्रतिनिधी
9421318021
गडचिरोली तालुक्यात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरु असून मागील वर्षभरात वाघाने जंगलात व शेत शिवारात लोकांवर हल्ला करून जवळपास १५ लोकांचा बळी घेतलेला आहे. त्यामुळे सदर नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करून लोकांचे प्राण वाचवावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे. याबाबतचे निवेदन भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन गोहने, यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी संभाजी ठाकरे, बालाजी पाटील जेंगठे प्रामुख्याने उपस्थित होते
मागील वर्षभरात वाघाने दयाराम चूधरी धुंडेशिवनी , डंभाजी डोंगरे, चुरचुरा, गोविंदा गावतुरे राजगाटाचक, पुंडलिक निकुरे भिकारमौशी, वंदना जेंगठे दिभना, कल्पना चौधरी महादवाडी, शोभा मेश्राम जेप्रा ,संध्या चिलमवार इंदिरानगर, मंजुळाबाई चौधरी गोगाव ,चापलेबाई गोगाव व अन्य अशा जवळपास दहा पंधरा लोकांचा बळी या वाघाने घेतला असून अनेक पाळीव प्राण्यांनाही ठार केले आहे. या वाघाला आता मानवी रक्ताची चटक लागलेली असून भविष्यात मोठी मनुष्यहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने आता वेळीच दखल घेऊन या वाघाचा बंदोबस्त करावा व या क्षेत्रात होणारी प्राणहानी थांबवावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली असून वाघाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास होणारा जनक्षोभाला सरकारला सामोरे जावे लागेल असा ईशाराही दिला आहे.