आठ दिवसांपासून सावरी बीड परिसरातील गावे अंधारात.....
विद्युत अधिकारी मस्त विद्युत ग्राहक त्रस्त...
चंद्रपूर जिल्हा सहसंपादक
राकेश भुतकर
मो न.8308264808
विजेची समस्या कायमच असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन ग्राहकांच्या समस्या सोडवायला हव्या अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे..
सावरी परिसरातील १२ गावांना विजेचा लपंडाव सुरू असते .पावसाची एक झळक आणि रात्रभर लाईट बंद ही समस्या कायमस्वरूपी असून शनिवारी झालेल्या अल्पशा पावसातच वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.शनिवारी ६.३० वाजता पावसाला सुरूवात झाली १०-१५ मिनिटांच्या पावसातच वीज गेली तेव्हापासून तर सावरी परिसरातील १२ गावे अंधारात आहे. सदर सावरी (बीड) येथे प्रशासकीय कार्यालय असून भारतीय स्टेट बँक,दोन ग्राहक सेवा केंद्र,पोस्ट ऑफीस, प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा आहे.विजेचा लपंडाव सुरू असल्यामळे प्रशासकीय कार्यालयाच्या बाहेर रांगा लागत असून सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.....
