विद्युत देयके भरून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित

विद्युत देयके भरून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित

नेरी वीज वितरण मंडळाचे दुर्लक्ष,शेतकरी अडचणीत

वीज पुरवठा तात्काळ सुरळीत सुरू न केल्यास आत्मदहन आंदोलन चा इशारा - काशीनाथ चांदेकर शेतकरी संघटना अध्यक्ष नेरी विभाग


प्रतिनिधी नेरी। प्रवीण वाघे

मो,7038115037


पावसाळ्याला सुरवात झाली असून शेतकरी हे खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून मशागतीच्या कामाला सुरवात झाली आहे परंतु मृग नक्षत्र संपूनही पाऊस आला नसल्याने शेतकरी चिंता ग्रस्त दिसून येत आहेत तेव्हा बियाणांची पेरणी करावी यासाठी नदी नाले व विहिरी च्या पाण्याने हंगामाला सुरवात करावी पण मागील 2 महिन्यापासून तर काही 2 वर्षांपासून वीज पुरवठा संच  बंद असून  वीज पुरवठा खंडित असल्याने पाणी असूनही हंगाम करू शकत नाही याबद्दल वीज वितरण कंपनी ला सूचना देऊनही अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत

           नेरी येथील वीज वितरण कंपनीला मागील अनेक दिवसांपासून बंडे व कटारा रिट येथील वीज पुरवठा संच हे निकामी झाले असून त्यातील साहित्य खराब झाले आहे ते बदलवून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी व अनेक शेतातील विजेचे खांब वाकलेले झुकलेले आहेत ते सरळ करण्यासाठी  शेतकरी वर्गानी कार्यालय गाठून अर्ज निवेदन व माहिती दिली असता ,अधिकारी वर्गानी शेतकऱ्यांना तुमची शेतीची विद्युत देयके पूर्ण भरा त्यानंतरच तेथील विद्युत संच व वीज पुरवठा सुरू करण्यात येईल तसेच वीज खांब सरळ करण्यात येईल असे सांगितले तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी विद्युत देयके भरून विजवीतरणला माहिती दिली परंतु दोन महिने लोटून ही विजवीतरनाचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत वारंवार सूचना व माहिती देईनही महावितरण काणाडोळा करताना दिसत आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत तेव्हा वीज वितरण महामंडळाने तात्काळ वीज पुरवठा सुरू केला नाही तर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना नेरी विभागाचे अध्यक्ष काशीनाथ चांदेकर यांनी दिला आहे.

वीज वितरण कंपनी ने शेतकऱ्यांना वीज बिल भरा अशी सूचना केली असता शेतकऱ्यांनी संपुर्ण वीज बिल भरले आणि वीज महामंडळाला वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सांगितले परंतु मागील 2 महिन्यापासून वीज पुरवठा संच बंद असल्यामुळे वीज पुरवठा खंडित आहे वीज पुरवठा सुरू झाले नाहीतर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही

काशिनाथ चांदेकर शेतकरी संघटना नेरी शाखा अध्यक्ष

वीज पुरवठा सुरळीत सुरू असून 11 के वि विद्युत वाहिनी मध्ये खराबी आल्यामुळे व वातावरण खराब असल्याने पाहणे शक्य नसून उद्याला समस्या पाहून दुरुस्त करण्यात येईल आणि पोल झुकलेले असल्याने शेवचे कनेक्शन बंद ठेवण्यात आले सर्व पोल सरळ करून कनेक्शन दोन दिवसात सुरू करण्यात येईल

ओ ए मुकादम सहाय्यक अभियंता

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler