प्रतिनिधी:- किनगाव
दहावी च्या परिक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची फीस परत करावी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव मार्फत मा ना सौ वर्षा गायकवाड आणि मा ना श्री बचु भाऊ कडू साहेब शालेय शिक्षण मंत्री यांना तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले
सध्या संपुर्ण भारत देशात कोरोना रोगाने थैमान घातले आहे त्यातच महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे सध्याची परिस्थिती पाहता खुप बेताची निर्माण झाली आहे, विशेष बाब म्हणजे सामान्य माणस, शेतकरी, कामगार, कष्टकरी मजुर हे आपल्या पाल्यांना शासकीय निमशासकीय शाळेत पाठवतात,कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता दहावी च्या परिक्षा रद्द करण्यात आल्या हा चांगला निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र इतिहासात प्रथमच घडले,या निर्णयावर विद्यार्थी व पालक सकारात्मक आहेत सरकारचे आभार मानले पाहिजेत तरी मा मंत्री महोदय यांनी तात्काळ विचार विनीमय करुन विद्यार्थी बदल योग्य तो निर्णय घेण्यात यावा जेणेकरून विद्यार्थी ना आर्थिक मदत होइल,असे असे प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे मा सौ वर्षा गायकवाड आणि मा ना श्री बचु भाऊ कडू साहेब यांना उपविभागीय अधिकारी कुदळे साहेब यांच्या मार्फत जिल्हा अध्यक्ष राजु भाऊ चौगुले उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड, ता अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले आहे प्रमुख उपस्थिती किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले शाखाअध्यक्ष योगेश आमले,उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले, इतर प्रहार सेवक पदाधिकारी उपस्थित होते
