💥 ब्रेकिंग ☄️☄️ आकाशात झालेल्या उल्कावर्षावाचे सर्वत्र चर्चा
प्रतीनीधी-प्रवीण वाघे,
परतवाडा, अंजनगाव, अमरावती, नागपुर चंद्रपुर सह राज्यातील बहुतांश भागात सायंकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास आकाशातून अतिशय लांब असे ,(राॅकेट सदृष्य)दुष्य अनेकांनी अनुभवले .हे आकाशातील अनुभवलेल्या दुष्याची नागरिकांनी शुटींग व फोटो पाठवून या बाबत अध्ययन समाचार कडे विचारणा केली असता,. या बाबत भुगोल अभ्यासकांकडुन माहिती जाणून घेतली असता हे उल्का वर्षाव असल्याचे सांगितले..... अभ्यासक म्हणाले... आज आकाशात झालेल्या घटनेला उल्कापात असे म्हणतात . आकाशातील उल्का पृथ्वीकडे येत असतांना पृथ्वीच्या चुंबकिय आकर्षनामुळे त्या भूपृष्ठावर वातावरणातुन येत असंताना झालेल्या घर्षनामुळे असा उल्काचा वर्षाव होत असतो . काही अर्धा तासा पूर्वी चंद्रपुर जिल्यात सिंदेवाही तालुक्यामध्ये लाडबोरी शीवारात रीगा पडल्या असल्याची सर्वत्र चर्चा संध्या सोशल मीडिया जोरात चालु आहे प्रशासन जोरात कामाला लागले असुन पुढील शोध चालु आहे.