आताची सर्वात मोठी ब्रेकीग- काल रात्री आकाशात ऊडत असलेल्या राकेटच्या अवशेशाचा एक भाग सकाळी पुन्हा सीन्देवाही तालुक्यातच पवनपार येथे सापडला
मोवाफुल वेचायला गेलेल्या शेतकाराना आढळला अवशेषचा तुकडा
इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे
प्रतीनीधी- प्रवीन वाघे
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर - पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.
दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत .. काल रात्री चंद्रपुर जिल्यातील सीन्देवाही तालुक्यात लाडबोरी येथे काही अवशेष मोठ्या प्रमानात सापडले होते त्याचेच काही भाग सीन्देवाही तालुक्यातच पवनपार येथे सापडले असल्यामुळे नागरीकामधे एकच खळबळ ऊडाली असुन पुन्हा काही अवशेष सापडन्याची शक्यता आहे.

