ओबीसी च्या आरक्षणा साठी भाजपा ओबीसी मोर्च्याच्या वतीने बुलडान्या आक्रोश आंदोलन

 ओबीसी च्या आरक्षणा साठी भाजपा ओबीसी मोर्च्याच्या वतीने बुलडान्या आक्रोश आंदोलन

 विशाल गवई तालुका प्रतिनिधी चिखली 7083304124

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने सबळ बाजू न मांडल्याने रद्द झाले.याबाबत महाविकास आघाड़ी सरकारची असलेली उदासीन व नाकर्ते पणाची भूमिके विरुद्ध व ओबीसी समाजाचे हे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी आज दि 3/6/2021 रोजी  बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाजपा ओबीसी मोर्च्याच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.आमदार विजयराज शिंदे,जिल्हा सरचिटणीस योगेंद्रजी गोड़े,ओबीसी मोर्च्या जिल्हाध्यक्ष रविंद्रजी ढाकने, ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश सचिव शालिनीताई बूंधे,युवा मोर्च्या जिल्हाध्यक्ष सचिनबापु देशमुख,मोहिला मोर्च्या जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर या प्रमुख मान्यवरांच्यां नेतृत्वात राज्य सरकार विरोधी घोषणा बाजी व फलक झळकावून आंदोलन करण्यात आले य्या वेळी भाजपा चे आजी माजी लोकप्रतिनिधि, पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler