ब्रेकिंग न्यूज--सावली वनपरिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळला.
सावली प्रतिनिधी
उमेश गोलेपल्लीवार
सावली-सावली तालुक्यातील उपवनक्षेत्रातील व्याहाड खुर्द अंतर्गत विरखल येथील भैयाजी वळुजी देशमुख यांच्या शेतात बिबट मृतावस्थेत आढळून आले.भैयाजी वळुजी देशमुख यांच्या शेताजवळील शेतकरी ढिवरुजी चिमुरकर हे शेती पाहण्यासाठी गेले असता त्यांना या बिबट मृतावस्थेत दिसले असता ढिवरुजी चिमुरकर हे विरखल येथे येऊन भैय्याजी देशमुख यांना सांगितले.देशमुख यांनी कोणताही विलंब न करता.सावली वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांना माहीती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी . व्याहाड येथील वनक्षेत्र साहाय्यक रवी सुर्यवंशी.वनरक्षक मेश्राम .सोनेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.त्यावेळी उपस्थित.पुनम झाडे.भैय्याजी देशमुख.ढिवरुजी चिमुरकर उपस्थित होते.