हळदा येथील वाघाच्या हल्यात युवक जखमी
ब्रम्हपूरी तालूका प्रतीनिधी
मनोज अगळे 9765874115
सदर जखमी युवक हा जगंलालगत असलेल्या आपल्या शेतामध्ये रोवनीचे कामे सूरू असल्याने युवक हा शेतीचे कामे करीत होता. परंतु दबा धरून बसलेल्या वाघाने त्या युवकावर हल्ला केला व फरफळत जगंलात नेले परंतु आजूबाजूला कामे करीत असलेल्या लोकांनी आरडाओरड केले. असता त्या वाघाने तिथून पळ काढला परंतू जखमी युवकाची प्रकृर्ति अत्यंत चितांजनक असुन त्याला ब्रम्हपूरी ग्रामिण रूग्नालय येथे ऊपचारा करीता हलविण्यात आले आहे. हळदा व बोडदा येथिल लोकांना वाघाच्या दहशती मध्ये आपल्या शेतीची कामे करावी लागत आहे. या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वाढत्या हल्यामुळे आणखी किती लोकांना आपला जिव गमवावा लागणार असा प्रश्न नागरिकाच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. जखमी हा विवाहित असून त्याच्या मागे आई, वडिल, पत्नि व दोन मूले आहेत. पुढील तपास मेडंकी पोलिस करित आहेत.
