प्रशांत डवले यांची संगणक परिचालक संघटना चिमूर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली

 प्रशांत डवले यांची संगणक परिचालक संघटना चिमूर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली


चिमुर तालुका ग्रामिन प्रतिनिधी

सचिन वाघे

मो.9673757006



महाराष्ट्र राज्यात आपले सरकार सेवा केंद्र शासकीय उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 11 वर्षांपासून संगणक परिचालक हे कार्यरत आहेत. ग्रामपंचायत मार्फत सर्व ऑनलाईन सेवा या आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जातात. संपूर्ण राज्यात 25 हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. आपल्या न्याय व हक्कासाठी या संगणक परिचालक यांची प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात संघटना बांधणी 11 वर्षांपासून करण्यात आलेली आहे. याच संगणक परिचालक संघटना चिमूर यांचे माध्यमातून दिनांक 7 जुलै 20121 ला पंचायत समिती चिमुरच्या प्रांगणात प्रशांत डवले यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

प्रशांत डवले हे गदगाव येथे 11 वर्षांपासून ग्रामपंचायत गदगाव येथे संगणक पदावर कार्यरत असून आपले कर्तव्य बजावत आहेत.  व जिल्हा संघटना चंद्रपूर उपाध्यक्ष म्हणून 7 वर्ष कार्यभार सांभाळले आहे

अध्यक्ष निवड प्रक्रिये सोबतच तालुका सचिव म्हणून शैलेंद्र पाटील संगणक परिचालक ग्रा.पं.पिंपळगाव तसेच तालुका उपाध्यक्ष म्हणून विकास खोब्रागडे संगणक परिचालक ग्रा.पं. पळसगांव यांची पण नियुक्ती करण्यात आली.

अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेनंतर प्रशांत डवले यांनी आपल्या मार्गदशनातून सांगितले कीं, शासनाकडून व प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा संगणक परीचालकांवर अन्याय होतांना दिसला तर ही संगणक परिचालक संघटना त्या अन्यायाच्या विरोधात उभी होत असते. त्याचप्रमाणे 11 वर्ष ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असून आमची नियुक्ती काँग्रेस सत्तेत असतांना म्हणजेच 2011 साली झाली असून सध्या महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र राज्यात सत्तेत आहे व काँग्रेस पण महाविकास आघाडी  सरकार चा एक भाग असून सत्तेत आहेत. तसेच विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण वचन दिले होते की आमची सत्ता येईल तर आम्ही तुम्हाला नक्कीच शासन सेवेत सामावून घेऊ असा शब्द श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांनी सर्व संगणक परिचालक यांना अधिवेशन काळात आझाद मैदान  मुंबई येथे संगणक परिचालक संघटना आंदोलन स्थळी येऊन दिला होता. मात्र आत्ता ठाकरे साहेबांना स्वतः दिलेल्या शब्दाचा विसर पडलेला दिसतोय. आणि म्हणून संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य सर्व संगणक परिचालक यांचे कडून महाविकास आघाडी सरकार ला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात-लवकर आम्हा संगणक परीचालकांचा प्रश्न मार्गी लावून शासन सेवेत सामावून घ्यावं व आम्हाला न्याय द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच आम्ही संगणक परिचालक आपल्या हक्कांसाठी व न्यायासाठी यथोचित प्रयत्न करू व आपला हक्क आम्ही मिळवूच असे स्पष्ट मत  त्यांनी तालुका अध्यक्ष निवड प्रक्रियेच्या नंतर मार्गदर्शनात व्यक्त केले.

जेव्हा-जेव्हा माझ्या संगणक परिचालक सहकाऱ्यावर अन्याय होतांना दिसेल तेव्हा-तेव्हा जीवाचे रान करून न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असेल असे त्यांनी आपले प्रकट मत व्यक्त केल

प्रशांत डवले यांची परत अध्यक्ष म्हणून चिमूर तालुका संगणक परिचालक संघटनेमध्ये निवड झाली असल्याने सर्व संगणक परिचालक यांचेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल चिमूर तालुक्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील संगणक परिचालक यांचेकडून आनंदमयी सदिच्छा व भविष्यातील संघटनेचे कार्य करण्यासाठीच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler