इसरूळ येथील बोटद्वारे रेती उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा

 इसरूळ येथील बोटद्वारे रेती उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा

चिखली | मेघा जाधव






इसरूळ बनले अवैध रेती उतख्तनंन केंद्र, त्या दोन बोटी तात्काळ जप्त करा - मनोज जाधव


दि.१८ मे रोजी इसरूळकरांच्या सततच्या मागणीवरून पर्यावरण मित्र सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी चिखली तहसीलदार यांना  तक्रार अर्जाद्वारे इसरूळ येथुन बोट द्वारे अवैध रेती उत्खनन राजरोस सुरू असल्याने रेती माफियांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे,

 चिखली तहसिल हद्दीत येणाऱ्या   दे राजा तहसीलच्या सरहद्दीवर बोटीद्वारे अवैध रेतीचा उपसा सुरू असून इसरूळ हे चिखली तहसिल हद्दीत येत असून त्याठिकानावरून दिवसाढवळ्या राम भुटेकर व डोईफोडे हे बोटद्वारे रेती उपसा करत असून स्थानिक तलाठी व मंडळाधिकारी यांच्या बरोबरच काही दिवसांपूर्वी इसरूळ येथील कर्तव्यदक्ष सरपंच यांनी गांधीगिरीद्वारे तसेच तहसीलदार यांच्या सह वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून  देखील आजरोजी  गावकऱ्यांवर  दबाव टाकून दिवसा ढवळ्या रेती उपसा सुरू आहे,काही दिवसांपूर्वी चिखली तहसिलचे नायब तहसीलदार यांनी त्याठिकाणी रेतीने भरलेल्या गाड्यावर कारवाई न करता समज देऊन सोडून दिल्या व  इसरूळ येथे  रेती काढणारी बोट,रेती भरणारी जे,सी,बी व दोन टिप्पर पकडून देखील सोडून का दिले हे अनुत्तरितच आहे ,दि.०३/०३/२०२२ च्या रात्री एल.सी.बी.च्या पथकाने देखील सदर बोट व त्याच ठिकाणी असलेल्या चार गाड्या पकडून देखील अर्थपूर्ण व्यवहार करून सोडून दिल्या व त्यांनंतर तहसीलदार अजितकुमार येळे यांनी सदर ठिकाणी धाडसी कारवाई करून रेती उपसा करणारे साहित्य लोखंडी पाईप जप्त केले परंतु उपसा करणाऱ्यांवर कारवाई न केल्याने व रेती उपसण्याची बोट देखील जप्त न केल्याने त्यांनी  लगेच दुसऱ्या दिवशीच बोट द्वारे परत रेती उपसा सुरू केला असून अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन ही सदर बोट का जप्त केल्या जात नाही व सदर होणारे उत्खनन ज्या शेतकऱ्याच्या शेतात सुरू आहे त्यांच्यावर का कारवाई केल्या जात नाही असा प्रश्नचिन्ह सरपंचा सह  गावकऱ्यांना पडलेला आहे तरी सदर प्रकरणाची चौकशी करून तहसिल,पोलीस प्रशासन व एल सी बी चे अधिकारी व कर्मचारी यांची सुरू असलेली हप्तेखोरी बंद करावी व इसरूळ येथील अवैध उत्खनन करणाऱ्या बोट वर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी गावकऱ्यांकडून होत असल्याने सदर तक्रारीची तात्काळ दखल घ्यावी ही विन्नती एक पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण मित्र मनोज जाधव यांनी चिखली तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.


*स्टेटमेंट*

*अवैध उतख्तनं करणारे व महसूल प्रशासन यांची मिलीभगत*


सरपंच संतोष भुतेकर


गेल्या तीन महिन्यापूर्वी देऊळगाव राजा व चिखली हद्दिवर ईसरूळ  येथून होणार्‍या अवैध रेती उतख्तनं व वाहतुक रोखण्यासाठी त्याच्या  निषेधार्थ रेती वाहतूक करणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करून गांधीगिरी आंदोलनाच्या माध्यमातून  प्रशासनाचा निषेध नोंदवला होता परंतु झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते की हे अवैध उत्खनन आपण कुठेतरी थांबवल पाहिजे त्या वेळेस तहसीलदार यांनी कारवाई केल्याने  कुठे तरी त्याला काही काळासाठी आळा बसला  होता मात्र त्यानंतर सदर अवैध रेती वाहतूक सातत्याने चालू असून या रेती माफिया कडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे सदर रस्त्याची जड वाहतुकीची क्षमता नसतांना देखील त्या रस्त्यावर अवैध वाहतूक सुरू ठेवून रेती माफिया व प्रशासन संगनमत करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असून प्रशासनाने हे सर्व तात्काळ बंद करावं व सर्वसामान्य जनतेच्या अबोल भावना समजून घ्याव्यात, प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी तोंडी तक्रार केली असता उलट ग्रामपंचायतला पत्र देऊन तुमची समिती गठीत केलेली आहे व तुम्ही त्याचे अध्यक्ष आहात म्हणून अवैध रेती उत्खननावर तुम्हीच आळा घालावा ती तुमची जबाबदारी आहे असं म्हणून स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकण्याचा अधिकार्यांचा प्रयत्न हा अतिशय केविलवाणा व  हास्यास्पद असून यासंदर्भात सरपंच या नात्याने मी चिखली तहसीलदार अजित कुमार येळे व अप्पर जिल्हाधिकारी गोगटे साहेब यांच्याकडे पाच वेळा तोंडी तक्रारी करून देखील त्यांनी पुरेस सहकार्य न केल्याने मी हतबल  असून अवैध रेती उतख्तनं व वाहतूक सुरूच असल्याचे इसरूळ गावचे सरपंच संतोष भुतेकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler