चिमुर तहसिलच्या शेतकऱ्यांना गोसेखुर्द धरणाचे पाणी मिळावे यासाठी पोपटे गुरुजींचे ना.बच्चु कडु यांना निवेदन

चिमुर तहसिलच्या शेतकऱ्यांना गोसेखुर्द धरणाचे पाणी  मिळावे यासाठी पोपटे गुरुजींचे ना.बच्चु कडु यांना निवेदन


नेरी-प्रवीन वाघे,


चिमुर-दि २०-चिमुर तहसील च्या संपूर्ण शेतकऱ्यांना गोसेखुर्द धरनाचे पाणी मोखेबर्डी उपसासिंचन योजने अंतर्गत पाणी मिळावे यासाठी चिमुर तालुक्यातील नेरी येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास पोपटे गुरुजींनी निवेदनातून राज्याचे जलसंपदा मंत्री ना. बच्चु कडु यांना चंद्रपूर जिह्याच्या दौऱ्यावर असतांना केली आहे

         माझ्या हयातीत चिमुर च्या शेतकऱ्यांना पाणी द्याल का हो ?असा आर्त टाहो   निवेदनातुन  बच्चु कडु यांच्या समोर फोडला आहे

     ७४ वर्षिय पोपटे गुरुजींनी 

   शारीरिक तमा न बाडगता गेल्या अनेक वर्षांपासून ते चिमुर च्या शेतीला सिंचनाकरिता पाणी मिळावे यासाठी धळपळतांना दिसून येत आहेत

     प्रहार जनशक्ती चे ना.बच्चु कडु यांचा चंद्रपूर जिल्ह्यात   शासकीय दौरा असल्याचे कळल्यावर गुरुजींनी संजय नागदेवते पत्रकार यांचे सोबत निवेदनावर सह्यासाठी गावोगावी या रखरखत्या उन्हात फिरुन सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष यांच्या शेती सिंचनास पाणी मिळण्यास पाठिंबा म्हणून सह्या घेतल्या   

     आणी स्थानिक प्रहार सेवक प्रविणभाऊ वाघे यांचे सोबत चंद्रपूर गाठले निवेदन देतांना ना.बच्चु कडु यांचेशी ते म्हणाले की अनादीकालापासुन चिमुर तहसिलची भुमी तहानलेली आहे तिची काही अंशी तहान ब्रिटिशांनी भागविली आहे 

     ती वाढत्या लोकसंख्येमुळे आता तुटपुंजी ठरत आहे आता भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली आहे तरीही या स्वातंत्र्याने आजपर्यंत सदर्हु जमीनिला पाणी पाजुन त्रुप्त केले नाही

    असे असले तरी नामदार साहेब लात माराल तिथे पाणी निघेल अशी तुमची ख्याती आहे

      १४ वर्षापूर्वी पोपटे गुरुजी यांनी चिमुर तहसील च्या शेतकऱ्यांना संघटित करून गोसेखुर्द कालवा शेतकरी संघर्ष समिती ता.चिमुर गठीत करून त्या माध्यमातून संघर्ष सुरू केला 

   आणी चिमुर तहसील पुढे शेतकऱ्यांनी धरने दिले नंतर विराट मोर्चा काढला व महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील  हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांना घेवून भव्य मोर्चा काढला 

   पुढे निवेदनात म्हटले की तत्कालीन जलसंपदा मंत्री यांच्या कडून 

   चिमुर तहसिलच्या शेतीला जलसिंचनाची कशी गरज आहे हे पटवून देवुन घोडाझरी धरण,कोरा धरण (लाल नाला प्रकल्प),हुमन प्रकल्प, आणी मोखेबर्डी उपसासिंचन प्रकल्पाचे पाणी पूर्ण चिमुर तहसिलच्या शेतीला मंजूर करून घेतले आहे 

       त्यानुसार काही भागात कालव्यांचे खोदकाम झालेले आहे परंतु १४ वर्ष निघून गेली तरी सदर कालव्यातुन पाण्याचा एकही थेंब प्रकल्पातुन वाहात आला नाही

   भानुदास पोपटे गुरुजी यांची शेतकऱ्यांप्रती अशी तळमळ आहे की त्यांच्या हयातीत या भागातील दुष्काळ ग्रस्त आणी कोरड्या दिसणाऱ्या भुमीला फळबागांनी ,शेती पुरक उद्योंगांनी वैभव संपन्न झालेली असेल म्हणून जलसंपदा राज्य मंत्री महोदय ना.बच्चु भाऊ कडु यांनी या भागातील कालव्याच्या कामाला गती द्यावी आणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पाणी द्यावे अशी आर्त मागणी निवेदनातून केली आहे.व राज्यमंत्री बच्चु कडु यांनी यादर्भात लवकरच तातडीची बैठक लाऊ असे आश्वासन दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler