अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या.किसान युवा क्रांती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन......
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भुतकर मो.न.8308264808
भद्रावती तालुक्यात सतत तीन दिवस गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.तालुक्यातील काही भागात जोरदार तर तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.त्यामूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी किसान युवा क्रांति संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस,हरभरा,गहू,तूर,वाटाणा, मका,लाखोळी,उडीद,मुंग,मिरची व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी या नव्याने आलेल्या अस्मानी संकटामुळे हवालदिल झाला आहे.त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष रविंद्रभाऊ गेजिक यांनी केली.यावेळी उपस्तीत उपाध्यक्ष विकास गजभे,प्रवक्ता अभिषेक भोयर, उपाध्यक्ष भारत बेलेकर,सचिव अजय मत्ते,पंकज पंडिले,स्वप्नील बुच्चे, आदित्य आवले, शुभम गेजिक,इत्यादी कार्यकर्ता उपस्तीत होते...