चिमुर तालुक्यातील गोंदेडा येथील वंदनीय राष्ट्रसंताच्या भजनात रंगली तपोभूमी

चिमुर तालुक्यातील गोंदेडा येथील वंदनीय राष्ट्रसंताच्या भजनात रंगली तपोभूमी


प्रतिनीधी- प्रवीण वाघे

मो, 7038115037



चिमुर- विदर्भाची पंढरी समजली जाणारी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत दि 13 जाने ला घटस्थापना संपन्न होऊन 62 व्या  गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सव ला सुरवात झाली अनेक कार्यक्रमा रेलचेलीत भजन सध्याच्या कार्यक्रमांत  परिसरातील अनेक भजन मंडळांनी भाग घेत वंदनीय राष्ट्रसंतानी लिहलेल्या आणि गायलेल्या भजनांच्या मेजवानीने  संपुर्ण तपोभूमी भजनात रंगली वंदनीय राष्ट्रसंताच्या भजनांनी तपोभूमीत भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली. 

       गुंफा महोत्सवात अनेक भजन मंडळांनी भाग घेतला असून शासनाच्या कोरोनाच्या नियमाचे पालन करून भजनसंध्या आयोजित करण्यात आले यात मास्क सॅनिटायसर आणि सुरक्षित अंतर ठेवून कमीत कमी गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वंदनीय महाराजांच्या भजनांनी संपूर्ण तपोभूमी अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन भजनात रंगली. गोंदेडा ग्रामवासीयांनी गावातील संपुर्ण रस्ते स्वच्छ करुन प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या रामधुन  ही टाळम्रुगदांच्या निदानात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ऊठ गड्या दिवस निघाला अश्या संपूर्ण घोषणा देत गावातुन पालखी निघाली. आजुबाजूच्या गावातील अनेक भजन मंडळांनी सहभाग घेऊन महाराजांच्या भजनाची सुरेल आवाजात गायन करून संपूर्ण तपोभूमीला भजनात रंगवून भक्ती सागराची निर्मिती केली. महिला आणि पुरुष भजन मंडळींनी भजनात चुरस निर्माण केली की या भक्तिमय महासागरात गुरुदेव भक्त आणि भाविक आकंठ बुडाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler