गांधी विचार संस्कार परीक्षेत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या डॉ.प्रा. मुळे व विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

 गांधी विचार संस्कार परीक्षेत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या  डॉ.प्रा. मुळे व विद्यार्थ्यांना सुवर्णपदक 




  चिखली


| मेघा जाधव                                    स्थानिक श्री शिवाजी विज्ञान कला महाविद्यालय चिखली या महाविद्यालयात ऑक्टोबर 2021 मध्ये *गांधी रिसर्च फाउंडेशन* जळगाव यांच्या वतीने महात्मा गांधींच्या विचारावर आधारित जिल्हास्तरीय परीक्षेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल गांधी रिसर्च फाउंडेशन जळगावच्या वतीने नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थीनी कू.आसमाबी कलीम शाह वर्ग बीए भाग 2 ,सौरभ चाकोते बीए भाग 2 व संकेत गवई भाग 1 या तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक व प्रमाण पत्र प्राप्त झाले आहे.      दिनांक 26 /04 /2022 रोजी महाविद्यालयात सदर पुरस्कार बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन मा. प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. मा. प्राचार्य यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. त्याचवेळी गांधी संस्कार परीक्षेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन डॉ.अनुराधा मुळे यांचाही सत्कार मा. प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला आहे. सदर परीक्षेचे आयोजन जिल्हा स्तरावर दरवर्षी मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयात करण्यात येत असते. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील **IQAC* समन्वयक डॉ. वनिता पोच्छी ,डॉ. जगदेव जाधव ,मराठी विभाग प्रमुख डॉ. गणेश मालटे, डॉ. विष्णू पडवाल, डॉ. सुनीता कलखे, डॉ.जुक्कलकर व इतर सहकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler