जि. प. प्राथमिक शाळा कोसरसार येथे पार पडला शाळा पूर्व तयारी मेळावा
जिल्हा संपादक चंद्रपूर
गणेश उराडे ८९२८८६००५८
तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा कोसरसार येथे शाळा पूर्व तयारी मेळावा पार पडला.
२९ जुन बुधवार ला प्रा.शाळा कोसरसार येथे मेळावा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनून ग्रा.प. सरपंच गणेश मडावी तर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष ग्रा.प.उपसरपंच अमित बहादुरे हे होते या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापक समिती चे अध्यक्ष प्रकाश बुरांडे ग्रामपंचायत चे सर्व सदस्य गण उपस्तिथ होते. उपस्थिताच्या हस्ते विधार्थ्यांचे स्वागत करण्यात आले सर्व विधार्थ्यांना शालेय पुस्तके आणी नवीन गणवेशाचे वाटप उपस्थित पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. शाळापूर्व तयारी मेळाव्यात विविध प्रकारचे स्टाल लावण्यात आले त्यात बोद्धीक विकास, शारिरिक विकास, गणनपूर्व तयारी, भासिक विकास, समाजिक विकास तसेच विविध साहित्याच्या माध्यमातून विधार्थ्यांची गुणवत्ता पळतळणी करण्यात आली या कार्यक्रमाला येशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याधापक ढोबळे सर, पाटील मॅडम आणी माहुरे मॅडम आणी गावातील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.