ध्येयवेडे लोक यशच शिखर गाठत असतात:-राजु केंद्रे
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा।समाधान बंगाळे
तालुक्यातील दुसरबीड येथे सिंदखेडराजा, लोणार येथील आपण सारे च्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र शेतकरी कुटुंबात जन्मलेले व आजही अडचणी च्या परिस्थितीमध्ये जीवन जगण्याचा अनुभव घेत असलेले व नुकतीच लंडनमधील विद्यापीठाच्या प्रवेशासाठी कॅनिंग स्कॉलरशिप प्राप्त झाले ले त्याच प्रमाणे मेळघाट यवतमाळ येथील पारधी बेड्यावर जाऊन त्यामध्ये व शिक्षणापासून वंचित घटकांमध्ये जाऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील करण्याच्या प्रक्रियेसाठी अथक प्रयत्न करणारे त्याच प्रमाणे एकलव्य ची स्थापना करून सामाजिक कार्य करणारे असा ध्येयवेडा युवक लोणार तालुक्यामधील छोट्याच पिंपरी खंदारे गावचा रहिवासी सामान्य शेतकऱ्याचा मुलगा परदेशी जाईल कधी स्वप्नातही न विचार केलेला राजू केंद्रे याचा सत्कार दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयांमध्ये आपण सारेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय नागरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6/7/ 21 रोजी करण्यात आला लोकजागरचे विश्वस्त श्री प्रवीण गीते यांच्या विचारातून राजू केंद्रे कसा घडला हे त्याच्या तोंडून वदवून घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा व असे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पत्रांमधून अनेक राजू केंद्रे तयार व्हावे या दृष्टिकोनातून हा सत्कार समारंभ ठेवण्यात आला राजू केंद्रे विद्यार्थ्यांसमोर आपले मत मांडत असताना आपण कोणत्याही प्रकारची शिकवणी किंवा आज या लोकांची मुले इंग्लीश मिडीयम च्या शाळेमध्ये जातात कसे शिक्षण घेतले नाही आपण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतले बुलढाणा येथील भारत विद्यालयांमध्ये बारावी पास झालो त्यानंतर मात्र मुक्त विद्यापीठांमधून मी बीए पास झालो व वर्गात व पुस्तकात शिकण्यापेक्षा बाहेरील जगामध्ये जास्त शिकलो टाटा मध्ये सुद्धा शिक्षण घेतले आपली परिस्थिती नाही आपण शिकू शकत नाही असा मनातील न्यूनगंड सर्वांनी काढून टाकावा आपली इच्छाशक्ती प्रबळ असल्यास अनेक हात पाठीवर थांप मारण्याकरिता समोर येतात आपले शिक्षण हे डिग्री मिळाली पाहिजे व नोकरी मिळाली पाहिजे एवढ्यापुरती सीमित न ठेवता आपणा मधील कलागुणांना वाव देऊन त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवल जे या अगोदर शंभर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली त्यांच्या पाठीशी शाहू महाराजांचा हात होता नोकरी मिळाली पाहिजे यासाठी शिक्षण न घेता टाटा मध्ये अनेक प्रकारचे शैक्षणिक कोर्स आहेत ज्यामुळे आपल्या मधील कलागुणांना वाव मिळू शकतो या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यासोबत राजू केंद्रे यांनी संवाद साधला त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अडचणी व त्यावरील उपाय सुचविले विद्यार्थ्यांनी माझा ईमेल घेऊन त्यावर कमेंट कराव्यात मी आपल्या संपर्कात राहील एकलव्य च्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, कार्यक्रमा करिता प्रवीण गीते दीपक नागरे,विनोद ठाकरे, विठ्ठल चव्हाण,अशोक सवडे,अशोक नागरे,दीपक कायंदे, विजय डोघोळे गणेश डोईफोडे,नंदू शिंगणे,विशाल इंगोले,शहजादा पठाण,व्ही टी जायभाये,यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाला माजी आमदार तोताराम कायंदे मधुकरराव देशमुख वामनराव जाधव प्राचार्य शिवराज कायंदे.क्रीडा मार्गदर्शक गजेंद्र देशमुख प्रा वाघ प्रा गणेश घुगे अनिल गायकवाड गजानन मुंडे अनिल रणमाळ नारायणराव नागरे महाविद्यालयाची प्राध्यापक व कर्मचारी तसेच परिसरामधील शिक्षणावर प्रेम करणारी मंडळी हजर होती या कार्यकर्माचे संचालन दीपक नागरे, तर आभार विनोद ठाकरे यांनी केले.
