नेरी येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल पंधरे यांच अपघाती निधन तर मित्र लिलाधर पिसे थोडक्यात बचावले
अपघातास कारणीभूत नेरी_चिमुर मार्गाची काळी गीट्टी,
चंद्रपूर-जील्हा प्रतिनीधी
प्रविण वाघे, 7038115037
चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील मुळ रहिवाशी तथा स्थानिक अभियंता अनिल पंधरे(वय ५५वर्ष )यांचे काल बुधवार दि. ७ जूलै ला नेरी चिमूर मार्गावर अपघातात दुख:द निधन झाल्याची घटना घडली .सदरहु अपघात रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडला असून त्यांचा घटनास्थळीच म्रूत्यू झाल्याचे सांगितल्या जात आहे .दरम्यान रस्त्यावर टाकलेली काळी गिट्टी अनिल पंधरे यांचे अपघातास कारणीभूत असल्याचे चिमूर नेरी येथील नागरिकांत खुलेआम बाेलल्या जात आहे . पंधरे हे गुरुदेव ग्रामीण बिगर शेतकी पतसंस्था नेरीचे संचालक ,चिमूरच्या सरकारी भात गिरणी संचालक , काॅंग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ता ,पक्षीय मार्गदर्शक, नेरी संताजी समाज मंडळाचे संस्थापक तसेच घरातील एकुलता एक कमावता व्यक्ति हाेता .एक दिलदार मित्र म्हणून त्यांची या परिसरात आेळख हाेती. वेळोवेळी गरिबांना मकान बांधकामास मदत व मार्गदर्शन त्यांनी केले आहे काल चिमुर येथुन सरकारी भात गिरणीची सभा आटोपून आपले सहकारी मित्र व भात गिरणीचे संचालक लिलाधर पिसे यांचे सह रात्री नेरीला येत असतांना काळाने घात केला हा .अपघात झाला त्या मार्गावर एका पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे समजते. कळमगांव गावाच्या अगोदर रस्त्यावर काळ्या गिट्टीचे दोन ढिगारे टाकल्याने
गिट्टीच्या ढिगा-यावरुन मोटारसायकल उसळल्यामुळे व चालक अनिल पंधरे यांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे अनेकांनी सांगितले दरम्यान मागे बसलेला सहकारी मित्र वाहनावरुन मागेच पडला. त्यास कुठलीही दुखापत झाली नाही,नेरी_ चिमूर मार्गावर आजपर्यंत बरेच अपघात झाले असून हा मार्ग जीवघेणा आहे की काय असा या परीसरातील नागरीकांना निर्माण होत आहे अनील पंधरे यांच्या पाठीमागे बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनानंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे
