वरोरा न.प. नगराध्यक्ष यांच्या चौकशीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिला आदेेेेश
चिमूर ( ग्रामीण ) तालुका प्रतिनिधी
सचिन वाघे 9673757006
बहुजन समाज पार्टी च्या मागणी ला यश.
कोरोना काळात सुरु असलेल्या दुकानावर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यामुळे त्या अधिकाऱ्याला विरोध करणाऱ्या वरोरा चे नगराध्यक्ष यांचेवर कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत बहुजन समाज पार्टी वरोरा यांच्या वतीने 6जून 2021रोजी उपविभागीय दंडाधिकारी वरोरा यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी याप्रकरणी नगराध्यक्ष यांची चौकशी करून अहवाल सादर करण्या बाबत चे पत्र उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा यांना दिले आहे.
या बहुचर्चित प्रकरणाच्या चौकशी कडे वरोरा तालुका, वरोरा शहरासह संपूर्ण जिल्हा वाशीयांचे लक्ष लागून आहे.
