तिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रविभाऊ शिंदे
वरोरा प्रतिनिधी_ताराचंद मोहुर्ले: मो, 9657401979
एक हात मदतीचा... रविभाऊ शिंदे यांचा...
वरोरा _तालुक्यातील खांबाळा येथे बाजाराच्या दिवसाचे औचित्य साधुन ग्रामीण जनतेशी संवाद ,दुसरी लाट भयावह होती, या लाटेने यावेळी ग्रामीण भागात शिरकाव केला, अनेक जवळच्या तरुण मंडळींचे जिव घेतले, त्यामुळे आता वेळीच सावध होवून तिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे, असे आवाहन आज (दि.९) ला वरोरा तालुक्यातील खांबाळा येथे बाजाराच्या दिवसाचे औचित्य साधुन ग्रामीण जनतेशी संवाद साधतांना दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रविंद्र शिंदे यांनी केले, निमित्ताने मास्क व सॅनिटायजरचे वाटप नागरीकांना करण्यात आले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर, दत्ता बोरेकर, डॉ. मोरेश्वर राऊत, नामदेव जोगे, देविदास धोटे, पंढरी भोयर, अंबादास येळेकार, दादा वैद्य, प्रमोद चौधरी, विशाल बोरेकर, गणेश बोरेकर, देवराव शेंडे, सुधाकर बुदान, अभिमान जोगी, अनिल वैद्य, कालेश्वर पेटकर, व मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते.
