मोटेगांव येथील युवकाचे अपघाती निधन
चिमुर ग्रामीण प्रतिनिधी अनिल भोयर
मो.नं:-9823534559
काल दिनांक ९/६/२०२१ रोज बुधवार ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास मोटेगांव येथील प्रफुल्ल प्रकाश राऊत वय २३ हा युवक सोनापुर वरून गावाकडे परतताना वाटेत सोनापुर आणि सारंगड जंगलातील वळणावर दुचाकी चे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी आदळल्याने अपघात झाला रस्ता कमी वर्दळीच्या ठिकाणी असल्याने तो बराच वेळ तिथे पडुन राहिला होता. कमी वेळाने एका वाटसरूला कोणीतरी पडून दिसल्याने त्याने ताबडतोब पोलिसांना फोन करून सांगितले व उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केले असता दवाखान्यात त्याची प्राणज्योत मालवली.विशेष म्हणजे सदर युवकाचे १महीण्याआधी लग्न झाले होते भावी वैवाहिक आयुष्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने घाला घातल्याने परीवारावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे..त्याच्यापश्चात दोन भाऊ आई व वहीणी असा बराच मोठा आप्तपरीवार आहे.गावात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सदर युवकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

