विवाहित तरुणानाणे विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या.
वणी तालुका प्रतिनिधी
अमोल बांगडे 9823787376
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील घटना.
कुंभा येथील विवाहित तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना दि. 9 जून रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान घडली.
प्रवीण सुनिल कुमरे वय 32 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून,मागील अनेक दिवसापासून तो आपल्याच विचारात राहायचा, कमी बोलायचा,त्याच्या घरातील कुटुंबातील लोकांशी वाद तो करीत होता, आणि त्याने अखेरचा निर्णय घेतला त्याने घरा जवडील विहिरीत उडी घेऊन प्राण गमावला.
प्रवीण कुमरे यांच्या पश्चातआई-वडील, दोन बहिणी, पत्नी व एक मुलगा आहे.दरम्यान घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता मालेगाव रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
