भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या गडचिरोली जिल्हा संघटक पदी विजय खरवडे यांची अण्णा हजारेनी केली नियुक्ती,,
संदीप कांबळे 9421318021
गडचिरोली प्रतिनिधी
राळेगणसिध्दी येथे दिनांक 18/08/2021 ला भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे ,राज्य सचिव अशोकजी सब्बन व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितील महाराष्ट्र राज्य स्तरीय जिल्हा अध्यक्षाची बैठक घेण्यात आली.व या बैठकीत संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हा व तालूका पातळीवर नव्याने नविन,जुने कार्यकर्त्याना संधी देऊन संघटनेत पद निर्मीती करीता प्रत्येक जिल्ह्यात नवं संघटन उभे राहणार असुन विजय खरवडे हे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे फार काळा पासुनचे जुने कार्यकर्ते आहेत. ते अण्णा हजारे यांचे निकटवर्तीय तथा राज्य समिती विश्वस्त गडचिरोली येथील प्रसीध्द डाँ.शिवनाथ कुंभारे यांच्या सोबत गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणुन गडचिरोली जिल्ह्याचा काम बघत होते. जिल्ह्यातील शहरी भागा पासुन तर ग्रामीण भागातील ईच्छूक कार्यकर्त्याना संघटनेमध्ये सहभागी करुन ग्रामसभा,माहितीचे अधिकार दप्तर दिरंगाई , व अन्य कायद्या संबधाने सर्वसामान्य जनतेला लोकशिक्षण ,लोकजाग्रूती असे जनहिताचे शिबीर व उपक्रम राबवणार आहेत. राष्ट्रहिता करीता जनआंदोलन उभा राहणार असुन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे कार्य यशस्वीपणे पार पाडल्या जातील या करीता गडचिरोली जिल्ह्यातील निपक्ष,निष्ठावंत,निर्व्यसनी व चारीञ्यशिल अशा कार्यकर्त्याची प्रत्येक तालुक्यात लवकरच कार्यकारीणी गठीत करुन त्यांची नावे जाहीर केल्या जातील. व भ्रष्टाचारावर अंकूश ठेवल्या जाणार असुन शासन व प्रशासन दरबारी पारदर्शी कामकाजास चालना मिळेल.व निय्यमबाह्य कामे होणार नाही यावर जिल्ह्यातील कार्यकर्त्याचा नियंञण ऱाहील.
तेव्हा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन प्रणेते अण्णा हजारे यांनी विजय खरवडे यांची भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या जिल्हा संघटन पदी निवड केली आहे.व सदर निवडीचे पञ पाठविले. त्यांच्या निवडी बद्दल डाँ शिवनाथ कुंभारे,पंडीत पुडके,सुखदेव वेठे,मोहन मदने,योगेश कुडवे,रमेश बांगरे,निलकंठ संदोककर,प्रभाकर सुर्यवंशी,जयप्रकाश हर्षे यांचेसह जिल्हाभरातील नागरीकानी विजय खरवडे यांचेवर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव केला.
विजय खरवडे यांच्या संघटक पदी निवडीचे जिल्हा स्तरावर कौतूक होत आहे.

