सावली हरांबा मार्गावरील खड्डे भुजवण्यात यावे सामाजिक कार्यकर्ता.ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी.

सावली हरांबा मार्गावरील खड्डे भुजवण्यात यावे सामाजिक कार्यकर्ता.ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी.

सावली तालुका प्रतीनीधी

उमेश गोलेपल्लीवार मो.7218949428


सावली-सावली ते हरांबा मुख्य मार्गावर असून हरांबा सावली रोडवर मोठे-मोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकाना जिव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे.सावली हे तहसील चे ठिकाण असुन हरांबा.लोढोली साखरी सिर्सी.पेडगाव जिबगाव उसेगाव सिंदोळा आदी गावातील शेतकरी व विध्यार्थी  नागरिकांना तहसील कार्यालय.सरकारी दवाखान्यात व पंचायत समिती च्या कामांकरिता ये जा करावे लागते.तसेच शालेय विद्यार्थी यांना सुध्दा सावलीला ये जा करावे लागत असुन त्यांना जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी यांना वेळोवेळी माहीती दिली असताना सुध्दा याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.बाधकांम विभागाचे अधिकारी या रोडवरून ये जा करत असतात पण या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.एखादी घटना घडल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येईल का असे आरोप सामाजिक कार्यकर्ता . ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार  यांनी  केला आहे.तरी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेत सावली ते हरांबा रोडवरील खड्डे त्वरीत भुजवावे अथवा काही घटना घडल्यास बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता . ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी  केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler