जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना...
शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा
शाळांमध्ये विद्यार्थीं झाले शिक्षक,मुख्याध्यापक
..जेव्हा विद्यार्थांच होतात शिक्षक !
जालना तालुका प्रतिनिधी
.रामप्रसाद शेळके
.9011884100
दिंनाक:-05 सप्टेंबर या
दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी डुकरी पिंपरी येथील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला.
शिक्षक दिन या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली. व कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडला.दुपारच्या सुट्टीनंतर विद्यालयाच्या सभागृहांमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.मदन.वाय.बी.आणि अध्यक्ष मा.श्री.वाघमारे.सी.जी.आणि इतर शिक्षकांना शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.यांनी विद्यार्थांना छान असे मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की शिक्षक स्वत:च्या मुलांप्रमाणे विद्यार्थांना अत्यंत काळजीपूर्वक आणि गांभीर्याने शिक्षण देतात.कोणीतरी बरोबर सांगितले की शिक्षक पालकांपेक्षा चांगले असतात.पालक मुलाला जन्म देतात,तर शिक्षक त्याच्या चारिञ्याला आकार देतात आणि उज्ज्वल भविष्य घडवतात.म्हणून,आपण त्यांना कधीही विसरू नये त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये,आपण त्यांचा आदर केला पाहीजे त्यांच्यावर प्रेम केले पाहीजे. आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.मदन.वाय.बी. यांनी शिक्षकाचे महत्त्व समाजात असलेली शिक्षकाची गरज या विषयी मार्गदर्शन केले
शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे कार्यक्रमांमध्ये 'मोरया' या गीताने गणेशवंदन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.भाषण,नृत्य,गायन,नाटक,मिमिक्री अशा दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले शिक्षकांसाठी अंताक्षरीसारख्या खेळाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते.सर्व शिकांनी या कार्यक्रमांचा आवर्जून आनंद घेतला. यामध्ये विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापले भाषणे सादर केली. भाषण स्पर्धेनंतर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मान करिता त्यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव आणि त्यांचे आभार मानले यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व
शिक्षकेत्तर कर्मचारी...
श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.,
श्री.मदन.वाय.बी.,
श्री.सोनकांबळे.डी.एन.,
श्री.नागरे.पी.पी.,
श्रीमती.देशपांडे.ए.बी.,
श्री.जाधव.एल.बी.,
श्री.ठाकरे.आर.एस.
श्री.राऊत.एस.बी.,
श्रीमती.खरात.एम.ए.आदिची उपस्थिती होती.
आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाचे श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.त्यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सादर केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थांचे कौतुक केले. आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
