बँकेसमोर लागतात लांबच लांब रांगा असंख्य नागरिक झाले त्रस्त

 बँकेसमोर लागतात लांबच लांब रांगा असंख्य नागरिक झाले त्रस्त


उमरेड तालुका प्रतिनिधी 

आशु लामसोगे 8855034555


उमरेड शहरात बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये नेहमीप्रमाणे लोकांना बँकेबाहेर रांगेत उभे राहून नाहक त्रास सहन करावा लागतो.


त्यामध्ये ग्रामीण भागांमधून शेतीच्या कामाला वेग आला असल्याने शेतीला पेरणीकरिता शेती बियाण्यांसाठी तर कुणाला आपल्या कुटुंबातील गरज पूर्ण करण्यासाठी तसेच निराधार लोकांना खात्यामध्ये जमा झालेल्या रुपयांची आधारासाठी गरज अशा अनेक प्रकारचे नागरिक या समस्यांनी ग्रस्त आहे.



 आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी येथे आल्यावर त्यांना रोजच हा त्रास सहन करावा लागतो

 यामध्ये बँकेतील सेवा मात्र कमकुवत असल्याने लोकांना दिवसा कडकडत्या उन्हामध्ये तासन तास उभे राहून आपला नंबर केव्हा लागेल याची वाट बघत बँके बाहेर उभे राहावे लागते हा त्रास बँकेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे होत असल्याने जनतेच्या समस्या कडे लक्ष केव्हा देणार याचा मोठा प्रश्न पडलाय ;


मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लवकरात लवकर लक्ष केंद्रित करावे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler