विविध मागण्यासाठी जिल्हाचे पालकमंत्री व कॅबिनेट वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.....
परंतू अर्जुनी तुकुम येथील भानुसखिंडी (तेरा) हा गेट पर्यटकाकरीता सुरू करण्याच्या प्रतीक्षेत.....
चंद्रपूर जिल्हा संपादक
राकेश भूतकर.....
मो. न.8308264808
चिमुर येथील शहीद दिनाचे सोहळ्याचा कार्यक्रमा प्रसंगी कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुंनगट्टीवर आले असता वरोरा तालुकातील अर्जुनी तुकुम येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील बोढे तसेच गावकऱ्यांनी विविध मागण्यासाठी जि.प.माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले...
वरोरा तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प लगत येत असलेल्या अर्जुनी तुकुम गावाची लोकसंख्या दोन हजार च्या जवळपास असुन या गावातील जनतेला धान शेतीच्या हंगाम झाल्यानंतर रोजगारा करीता भटकंती करावी लागते मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर अंतर्गत परीक्षेत्र ताडोबा मधील नियतक्षेत्र भानुसखिंडी (तेरा) हा गेट पर्यटकाकरीता सुरू करण्यात आला तर गावातील तसेच परिसरातील वायगाव भोयर, चारगाव अर्जुनी तुकुम, किन्हाळा, धानोली,आष्टा,सोनेगाव,दादापुर गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पर्यटक संख्या वाढण्यास मदत होईल. भानुसखिंडी या परिसरात वन्य प्राण्यांच्या वापर मोठ्या प्रमाणात होत असून शेत शिवारात शेतकऱ्यांना जंगलातील वन्यप्राणी पाहायला मिळत असतात.वरोरा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे चंद्रपूर, नागपूर,यवतमाळ भंडारा, इत्यादी जिल्ह्यातील पर्यटकांसाठी सोयीस्कर होईल. भानुसखिंडी गेट सुरू झाल्यास आदिवासी असलेल्या गावांमध्ये विकासाला चालना मिळेल तसेच ग्रामीण युवकांचे बाहेर राज्यांमध्ये रोजगाराकरीता भटकंती थांबण्यास मदत होईल आणि वरोरा तालुक्यातील व परिसरातील गावातील मोठी बाजारपेठ असलेल्या शेगाव या ठिकाणी व्यापाराकरीता मोठे सहकार्य लाभेल.अर्जुनी तुकुम येथे बफर आणि कोरचे नाका तयार झाले असून येथूनच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जंगल जवळ असल्याने अर्जुनी तुकुम, वायगाव भोयर, कोकेवाडा,सोनेगाव, किन्हाळा,आष्टा येथील शेतकऱ्यांना शेत पिकासहित विविध कुटीर उद्योगांना चालना मिळण्यास मदत होईल याकरिता भानुसखिंडी गेट पर्यटना करीता चालू करावे या मागणीचे निवेदन जि.प.माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यामार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री, कॅबिनेट वनमंत्री सुधीरभाऊ मुनगट्टीवार यांना ग्रामपंचायत सदस्य सुनील बोढे व गावकऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले होते परंतू अर्जुनी तुकूम येथील भानुसखिंडी (तेरा) हा गेट पर्यटकाकरिता सुरू होण्याच्या प्रतीक्षेत .......