बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका संघर्षशील व्यक्तिमत्व खामगाव रत्न श्री बाबासाहेब भोसले पहेलवान
;अमोल भोलनकर बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी 8262087866, नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आज आमच्या भोसले परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा तसेच अभिमानाचा दिवस आहे.आमच्या घराण्याच्या नावलौकिक वाढविणारे आमचे प्रेरणास्थान,आमचे मार्गदर्शन,गुरु म्हणजे आमचे वडील बाबासाहेब भोसले पहेलवान यांचा 8 एप्रिल2022 रोजी 75 व्या वाढदिवस निमित्त अमृत महोत्सवाचे आयोजन केले आहे.त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अनुषंगाने मी आपणास आमच्या भोसले परिवार वखामगाव रत्न श्री बाबासाहेब भोसले पहेलवान.यांची थोडक्यात शब्दातज्येष्ठ श्रेष्ठाच्या तोडून ऐकलेली तर मी स्वानुभवगलेला संघर्षमय जीवन गाथा ते आज आपल्या समोर मांडत आहे.आमचा भोसले परिवार हातसा मुळातच वेरूळचा भोसले घराण्याचे निगडित आहे.या घराण्याचे वंशज म्हणूनच आमची ओळख आहे.कालांतराने आमची पूर्वज पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मूर्ती मोडवे या गावात वास्तव्यास होते.स्वातंत्र्य पूर्वी म्हणजे जुन्या काळात दुष्काळ पडल्याने उदरनिर्वाहाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती.हाताला काम नसल्याने कोल्हापूरचे छत्रपती महाराज यांच्याकडून महाराष्ट्र रेल्वे मार्ग बनविण्याचे काम असल्याची माहिती मिळाली.यावेळी छत्रपतीशाहू महाराजांनी तुम्ही ते काम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात व-हाड मध्ये जा.जेणेकरून तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल व आपल्याला दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल.असे त्यांनी सुचविले.खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष एकचघाव चे संपादक मा. श्री.किशोर आप्पा भोसले खामगाव.
