रोहणा ग्रामपंचायत विकास कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा* भारतीय मानवाधिकार संघटन ची मागणी

 *रोहणा ग्रामपंचायत विकास कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा*
भारतीय मानवाधिकार संघटन ची मागणी 

विशाल गवई तालुका प्रतिनिधी चिखली 7083304224

 बुलढाणा:- मौजे रोहणा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे झालेल्या विकास कामांची सखोल चौकशी करून ग्रामसेविका श्रीमती नवले मॅडम यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या खोट्या सह्या करून ठराव पारित केल्याप्रकरणी सखोल चौकशी होऊन फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या आशयाचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग बुलडाणा यांना भारतीय मानवाधिकार संघटन च्या वतीने देण्यात आले.
ग्रामपंचायत रोहणा चे उपसरपंच सौ अनिता रामप्रसाद डोके व सदस्य संतोष जनार्धन कदम यांनी यांनी वारंवार गट विकास अधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा यांना तक्रारी दिलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने तसेच हताश न होता अखेर त्यांनी भारतीय मानवाधिकार संघटनेशी संपर्क साधला त्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांचे पाहणी करून तसेच दिलेल्या तक्रारीचे अवलोकन केल्यावर असे लक्षात येते की गट विकास अधिकारी देऊळगाव राजा तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी हे ग्रामसेविका श्रीमती नवले मॅडम यांना पाठीशी घालत आहे तसेच त्यांच्या मागे राजकीय पाठबळ असल्याचे सांगीतले आहे. गाव पातळीवर उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता व यांच्या नावाने खोट्या सह्या करून खोटे व बनावट ठराव पारित करत आहे म्हणजेच गावात जे विकास कामे होत आहे ते फक्त कागदावरच होत असल्याचा आरोप उपसरपंच व ग्राम सदस्य यांनी केला आहे. 
ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांनी दिलेल्या माहिती व अधिकारावरून भारतीय मानवाधिकार संघटनेच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की ग्रामपंचायत रोहणा येथील झालेल्या विकासकामांची सखोल चौकशी करण्यात यावी व श्रीमती नवले मॅडम व ईतर संबधित अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास बडतर्फ करुन फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येऊन रोहणा ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्य यांना न्याय देण्यात यावा. निवेदनावर भारतीय मानवाधिकार संघटन चे जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रविणकुमार काकडे, जिल्हा सचिव जाकेरा बी शेख कलाम, जिल्हा संघटक संतोष कदम उपसरपंच अनिता रामप्रसाद डोके, चिखली तालुका अध्यक्ष दिनेश आढवे, तालूका सचिव कल्पनाताई  केजकर यांच्या सहया आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler