निराधारांना आ सौ श्वेताताईचा आधार
:- विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर .
प्रवीण दरेकर यांच्या हस्ते धाड येथील आधार कोविड सेंटरचे उदघाटन .
चिखली:-तालुका प्रतिनिधी विशाल गवई
धाड ÷ गेल्या एक वर्षांपासून राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे . सारी जनता , सरकारे हैराण आहे . केलेल्या सर्व उपाययोजना तोकड्या पडत आहे . कोरोना महामारीच्या या काळात कोरोना निर्मूलनासाठी केलेला छोटासा प्रयत्न देखील फार मोठा दिलासा देऊन जात आहे . त्यामुळेच आ सौ श्वेताताई महाले यांनी कोरोना रुग्णा साठी सुरू केलेले आधार कोविड केअर सेंटर निराधार , गरीब रुग्णांचा आधार ठरणार असल्याचे प्रतिपादन
विधान परिषदेने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आ सौ श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्व दयासागर महाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ धाड येथील आधार कोविड केअर सेंटरच्या उदघाटन प्रसंगी केली . यावेळी त्यांनी आधार कोविड केअर सेंटरसाठी पाच ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्याची सुद्धा घोषणा केली .
दि 29 मे 2021 रोजी धाड येथील सहकार विद्या मंदिराच्या भव्य वास्तूमध्ये आ सौ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांतून 50 खाटांच्या आधार कोविड केअर सेंटरचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
यावेळी मंचावर राज्य उपाध्यक्ष मा आ चैनसुख संचेती , भाजपा जिल्हाध्यक्ष आ ऍड आकाश दादा फुंडकर , राज्य कार्यकारिणी सदस्य मा आ विजयराज शिंदे , राधेश्यामाजी चांडक , संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन , सतीश गुप्त , जेष्ठ नेते, तथा अध्यक्ष चिखली अर्बन बँक, ऍड विजयजी कोठारी , राज्य कार्यकारिणी सदस्य भाजपा ,डॉ प्रताप राजपूत , जिल्हा उपाध्यक्ष भाजपा , मा डॉ प्रतापसिंह राजपूत , जिल्हा उपाध्यक्ष भाजपा , देवीदासजी जाधव , जिल्हा उपाध्यक्ष भाजपा , श्रीरंग अण्णा एन्डोले , सौ सिंधुताई तायडे , पंचायत समिती सभापती चिखली , ऍड सुनील देशमुख , तालुका अध्यक्ष भाजपा , डॉ कृष्णकुमार सपकाळ , चिखली तालुका अध्यक्ष , सौ व्दारका ताई भोसले , चिखली तालुका महिला अध्यक्ष , संदिप उगले , पंचायत समिती सदस्य योगेश राजपूत , किरण सरोदे , विशाल विसपुते , जितू जैन , टीका खान , सोहेल सौदागर यांची उपस्थिती होती .
विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर यांचे आगमन होताच त्यांना पिंपळाचे झाड देऊन त्या वृक्षाचे त्यांच्या हस्ते रोपण करण्यात आले . त्यानंतर दरेकर साहेब यांच्या हस्ते रिबीनची गाठ सोडून आधार कोविड केअर सेंटरचे रुग्णांर्पण करण्यात आले . त्यांनतर स्व दयासागरजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
ना प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की , आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली येथ 50 सर्वसाधारण तर 20 ऑक्सिजन असे 70 खाटांचे कोविड हेल्थ सेन्टर सुरू करून रुग्ण सेवा सुरू केली आहे . तसेच ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा परिसरातच कोरोनाचा उपचार मिळावा यासाठी धाड येथे 50 खाटांचे कोविड केअर सेन्टर आज रुग्ण सेवेत दाखल झालेले आहे . त्यामुळे ग्रामीण जनतेला फार मोठा दिलासा मिळणार आहे . त्यामुळे आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करीत असल्याचे कौतुक ही ना दरेकर यांनी केले आहे.
सर्व कोविड उपचार सेन्टर व रुग्णालये ओस पडावी .
उदघाटनाच्याच दिवशी आ सौ श्वेताताई महाले यांनी केली प्रार्थना .
कोरोना महामारीचे संकट अख्ख्या जगावर घोंगावत आहे . जगातील 25 % पेक्षा जास्त लोकसंख्येला कोरोनाने बाधित केले आहे . परंतु कोरोना महामारीने सारे जग वेठीस धरले आहे . अधिकृत आकडा जरी कमी असला तरी हा आकडा या पेक्षा जास्त आहे . कोरोनाचा तातडीने नायनाट व्हावा असे प्रयत्न करणे गरजेचे आहे . त्यासाठी चिखली येथे 70 खाटाचे कोविड हेल्थ सेंटर सुरू केले . त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा कोरोना उपचार करण्यासाठी धाड येथे सुद्धा 50 खाटांचे केअर सेन्टर सुरू करण्यात येत आहे
कोरोनाने मानवाला बाधितच केले असे नसून अनेक जीव घेतले . कुटुंबचे कुटुंब उध्वस्त झाले . त्यामुळे कोरोनाचे समुळ उच्चाटन होऊन मानवजात कोरोनामुक्त व्हावी आणि जगातील सर्व कोरोना उपचार केंद्रे आणि दवाखाने ओस पडावी अशी प्रार्थना आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगीच केल्याने कोरोनाला हद्दपार करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे .
खाजगी दवाखान्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना संलग्न करा. आ सौ श्वेताताई महाले पाटील
कोरोना सोबतच म्युकर मायकोसिसचा धोका वाढत चाहलेला आहे . कोरोना व म्युकर मायकोसिसचा उपचार शासकीय रुग्णालयात जरी मोफत असला तरी त्याची अंमलबजावणी नसल्याने रुग्णांना त्याचा फार कमी लाभ होत आहे . तसेच
खाजगी दवाखान्याचा उपचार गोरगरिबांच्या आवाक्याबाहेरचा आहे . त्यामुळे राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करून कोरोना व म्युकर मकोसिसचा मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी ना दरेकर साहेबांकडे करून त्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती सुद्धा केली आहे.
आ सौ श्वेताताई महाले यांची रुग्ण सेवा जनता विसरणार नाही .… मा आ चैनसुख संचेती
आ सौ श्वेताताई महाले यांनी सातत्याने कोरोनाच्या काळात घरात न बसता कोरोना उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे . केवळ कोरोना संपला पाहिजे यासाठीच त्यांचे प्रयत्न नसुन कोरोना रुग्णां कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांनी चिखली आणि धाड येथे कोविड सेन्टर उभारले त्यांचा हा प्रयत्न जनात कधीही विसरणार नसल्याचे मा आ चैनसुख संचेती यांनी यावेळी सांगितले .
आधार रुग्णांना संजीवनी देईल
मा आ विजयराज शिंदे
स्वप्नांतही वाटले नव्हते की माणसे माणसापासून दूर जातील , आतापर्यंत आजारी माणसाला जाऊन भेटणे , त्यांना दिलासा देणे , त्यांना सहानुभूती जतावणे हे औषधोपचाबरोबर आजार दूर करण्याचा मानसिक आधार होता । परंतु कोरोनाच्या आजारात जाऊन भेटणेच बंद झाले . एव्हढेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याच्या मौतीत ही जाता येत नसल्याने कोरोनाची धास्ती वाढली आहे . कोरोनाने माणसेच माणसा पासून दूर गेली नसून माणुसकी सुद्धा दूर गेल्याची खंत मा आ विजयराज शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली .
आ सौ श्वेताताईचा हा जीवनदायी उपक्रम
……सतिशजी गुप्ता
आ सौ श्वेताताई महाले पाटील या कोरोनाचा राज्यात प्रवेश झाल्यापासून कोरोनासोबत लढत आहेत . कोरोनापासून दूर राहण्यासाठीच्या उपाययोजना असोत की सॅनिटाईझर , मास्क वाटप असो , आ सौ श्वेताताई महाले सातत्याने कोरोनासोबत लढत आहे . सोबतच कोरोना बाधितांना कोरोना पासून मुक्तता मिळावी आधार कोविड केअर सेंटर सुरू केले आहे . त्यांचा हा उपक्रम जीवनदायी उपक्रम ठरणार असल्याचे प्रतिपादन भाजपा जेष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश जी गुप्त यांनी आपल्या भाषणातून केले आहे .
अनेक दात्यांनी या यज्ञकुंडात सहभाग घेतला
आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांचे सासरे स्व दयासागरजी महाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिखली आणि धाड येथे कोरोना रुग्णांचा मोफत उपचार करण्यासाठी कोविड केअर सेन्टर सुरू केले. यामध्ये फुल ना फुलांची पाकळी म्हणून अनेक दात्यांनी या यज्ञात समिधा टाकण्यासाठी पुढे सरसावले आहे . यामध्ये यावेळी प्रा . वीरेंद्र वानखेडे यांनी 25 हजार रुपये , श्री प्रकाश पडोळ 21 हजार रुपये , श्री अरुण पाटील तायडे यांनी 11 हजार रुपये तर श्री विष्णु पाटील वाघ 11 हजार रुपयांचा धनादेश ना प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आ सौ श्वेताताई महाले यांच्याकडे सुपुर्द केला .
या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी विजय भोंडे , डॉ. अनिल जाधव , शालिग्राम कानडजे , मंगेश जाधव , कल्याणराव कानडजे , संतोष राव कानडजे , शरद देशमुख , अर्जुन लांडे , गोपाळ तायडे , सिद्धू लडके , दत्ता शेवाळे , प्रकाश पाटील , संदीप सोनवणे , संतोष पालकर , गौरव राठोड , ऋषी वाघ , संदीप पडवळ , पाटील , देवेंद्र पायघन हा मयूर पडवळ, समाधान आघाव , शंकरराव तरमळे ,साहेबराव पाटील,संदिप सोनुने , पुरुषोत्तम भोंडे ,अरुण पाटिल , गजानन देशमुख ,राजू चांदा , सारंगधर वाघ, समाधान मुरकुटे, विनोद तायडे ,समाधान पालकर, राजेंद्र कानडजे, अनिल जाधव, बबन सुसर, जितेंद्र तायडे , माजी सरपंच गजानन तायडे , शिवहरी मान्टे , भगवान पिपळे , पंजाबराव शिमरे , सोनू तायडे यांनी परिश्रम घेतले .
