प्रहार च्या आंदोलनाच्या दणक्यात नेरी ग्रामपंचायत कडुन लेखी आश्वासन.

प्रहार च्या आंदोलनाच्या  दणक्यात नेरी ग्रामपंचायत कडुन लेखी आश्वासन.


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे


चिमुर:- नेरी ग्रामपंचायत नी अपंगांचा ५ टक्के निधी हा गेल्या पाच ते सहा वर्षापासून अपंग बांधवांना वाटप केला नाही. याबाबत य मागील चाळीस दिवसा अगोदर बिडीओ, साहेब चिमुर या यांना प्रहार संघटनेमार्फत निवेदन सादर केले होते, चाळीस दिवसही लोटून गेले तरी प्रशासनाने यावर काहीच तोडका काढला नाही. याकरीता आज 16,9,2021,रोज गुरवाला प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार वाहन चालक संघटनेकडून ग्रामपंचायत सामोर डफली बजाव आंदोलन झाले या आंदोलनाची सुरवात गुरुदेव सेवा मंडळ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुष्पमाला अर्पण करून बाजार चौकातून तर थेट ग्रामपंचायत पुढे  पोहचले काही वेळ आंदोलन चालताच पोलीसांना मध्यस्थीने

ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक मेंमर कर्मचारी यांनी आंदोलन स्थळी भेट देत मागील ६ वर्षापासून 2015 पासुन 2021पर्यंत अपंग बांधवांना ६ वर्षांत अपंगांसाठी नेरी ग्रामपंचायत कडुन किती निधी खर्च झाला याची माहिती दिली. खालीलप्रमाणे

2015,-1016, 2017,या तीन वर्षांत नेरी ग्रामपंचायत नी अंपगाचा ५ टक्के निधी  हा खर्चच केला नाही. शिल्लक ३ वर्षाचा निधी हा ३ सायकली,३,कर्न यत्र 47200रु खर्च केले असुन 202020,2021मध्ये वित्त वर्ष संपल्यानंतर डिसेंबर पर्यंत ५ टक्के निधी हा खर्च करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे. मागे रखडलेला ३ वर्षाचा निधी हा गेला कुठे याची सविस्तर चौकशी करून वरीष्ठ अधीकारी यांना परीपत्रकाद्वारे माहिती काढुन तो थांबलेला निधी हा वाटप करण्यात येईल असे लेखी स्वरूपात दिले.मागील ३ वर्षाचा निधी हा का वाटप केला नाही. याची त्वरीत चौकशी करुन तो निधी अपंगांना वाटप करा नाही तर येत्या दिवसात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथील अनेक मागण्या रेटुन धरत आंदोलन चालू असतांना डाॅ, वाघे डाॅ, डांगरे, यांनी आदोलन स्थळी भेट देत त्यांनी सांगील्याप्रमाने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे डाॅ, निखिल कामडी,डाॅ,निखील,डांगरे,असे दोन एमबीबीएस, डाॅक्टर रुजु झाले असून तुमच्या पुढील शिल्लक मागणीसाठी आम्ही वरीष्ठांनकडे सदर ह्या निवेदनाचा पाठपुरावा करुन ह्या तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे लेखी आश्वासन दिले आहे. सदर नव्याने रुजू झालेले एमबीबीएस, डाॅ,निखिल डांगरे यांनी आंदोलन स्थळी भेट देत त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार वाहन चालक संघटनेच्या वतीने गळ्यात हार टाकुन सत्कार करण्यात आला. व आंदोलन स्थगित करण्यात आले.

 त्यानंतर आंदोलन हे स्थगित करण्यात आले. या आंदोलनाचे नियोजन प्रवीण वाघे, हे होते तर शेरखान पठाण, महेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन संपन्न झाल. सहभागी प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler