आंदोलनाच्या दोन दिवसा अगोदरच प्रशासनाने नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन एमबीबीएस डाॅक्टर सेवेत ऊपलब्ध करून दिले

आंदोलनाच्या दोन दिवसा अगोदरच प्रशासनाने नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन  एमबीबीएस डाॅक्टर सेवेत ऊपलब्ध करून दिले

प्रहार संघटनेच्या रेटून धरलेल्या मागणीला यश. 


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

प्रवीण वाघे

चिमुर:-चिमुर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वात मोठे केंद्र असून या केंद्राला सहा उपकेंद्र जोडलेले आहेत परंतु हे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक समस्यांनी ग्रासलेल आहे. तीथे तज्ञ वैदयकीय अधिकारी नसुन रात्री ला तर डाॅक्टरच नाही तीथे पिण्याच्या पाण्याची सोय सुविधा नाही अश्या अनेक समस्या घेऊन प्रहार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना 3,9,21,ला सदर निवेदन सादर करुन येत्या दहा दिवसाच्या आत एमबीबीएस डाॅक्टर सेवेत रुजू करुन न दिल्यास प्रहार संघटनेकडुन थेट खुर्ची जप्ती आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता. दहा दिवस लोटून गेले मात्र प्रशासन जागे झाले नाही. त्याकरीता झोपलेल्या प्रशासनाला जागे करन्यासाठी प्रहार संघटनेने आंदोलनाचे नियोजन करुन बाराव्या दिवशी  16,9,2121,ही आंदोलनाची तारीख घेऊन थेट निवेदन उपविभागीय अधिकारी, तसेच आरोग्य विभाग  तालुका अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन चिमुर येथे देण्यात आले. ताबडतोब शासनाला एकाच दिवशी जाग येऊन दुसर्या दिवशीच दोन एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी नियुक्त करुन सेवेत रुजू करुन दीले .प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी याबाबत अनेक समस्या घेऊन दि, 16,9,2021,ला ग्रामपंचायत नेरी पुढे आंदोलन चालू असतांना उपस्थित पोलीस निरीक्षक गभने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजु गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथील नवनवीन तज्ञ वैद्यकीय अधिकारी, डाॅ, निखिल डांगरे, व डाॅ सतीश वाघे यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रहार संघटनेने रेटून धरलेल्या मागण्या  नेरी प्राथमिक आरोग्य केद्रात अनेक पदे रिक्त आहेत त्यांची सुद्धा  त्यात आरोग्य सहाययक, औषधी निर्माण, अधिकारी कनिष्ठ, लिपिक, आरोग्य सेवक,  परिचर,  अतिरीक्त स्टाफ नर्स ,व अतिरीक्त अंबुलन्स ड्रायव्हर असे अनेक पदे रिक्त आहेत असे निवेदन देण्यात आले. व डाॅ वाघे डाॅ डांगरे, यांनी आदोलन स्थळी सांगील्याप्रमाने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे डाॅ, निखिल कामडी,डाॅ,निखील,डांगरे,असे दोन एमबीबीएस, डाॅक्टर रुजु झाले असून तुमच्या पुढील शिल्लक मागणीसाठी आम्ही वरीष्ठांनकडे सदर ह्या निवेदनाचा पाठपुरावा करुन ह्या तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे लेखी आश्वासन दिले आहे. सदर नव्याने रुजू झालेले एमबीबीएस, डाॅ,निखिल डांगरे यांनी आंदोलन स्थळी भेट देत त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार वाहन चालक संघटनेच्या वतीने गळ्यात हार टाकुन सत्कार करण्यात आला. व आंदोलन स्थगित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler