घरगुती वादातून महिलेस बेदम मारहाण

घरगुती  वादातून  महिलेस बेदम मारहाण

आरोपीवर गुन्हा दाखल मात्र डाॅक्टरांच्या सल्लेनुसार आरोपीला घरीच विश्रांती आता पोलीस  अटक केव्हा करनार  याकडे नेरी वासीय जनतेचे लक्ष


चंद्रपूर प्रतिनिधी

प्रवीण वाघे 

चिमुर तालुक्यातील नेरी येथिल गांधी वार्डात राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये घरगूती कारणावरून वाद झाला  या वादाचे पर्यवसान मारझोड मध्ये झाले यात युवकाने महिलेला बेदम मारहाण केली लगेच महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करताच युवकावर गुन्हे  केले 

                नेरी येथील गांधी वार्डात सूर्यभान कामडी आणि गोकुलदास  शेंडे यांची एकमेकांना लागून शेजारी हे दोन्ही परिवार  राहतात मागील अनेक दिवसांपासून या दोन्ही परिवारात घरगूती कारणावरून वाद सुरू आहेत मागील नागपंचमीला गोकुलदास शेंडे यांच्या मुलालाने नामे राकेश शेंडे  यांनी मद्यपान करून सौ मंजुषा सूर्यभान कामडी या महिलेला अश्लील शब्दात शिवीगाळ केली परंतु त्यांनी या शिवीगाळ कडे कानाडोळा करीत दुर्लक्ष केले आणि याबद्दल सामंजस्याने रुपेश च्या आईला समजावून सांगितले यानंतर दि 4 सप्टेंबर ला रुपेश हा दारू पिऊन आला आणि घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करू लागला त्यावेळेस मंजुशा ईचे पती कामावर गेले असल्याने घरात एकटीच असल्याने त्याने जोरदार भांडणं करू लागला मंजुशा ईने त्याला याबद्दल विचारले असता माज्या आईला माज्याबद्दल काहीही सांगून भडकवीत आहे असे बोलून मी अंगणातील कपडे काळीत असताना माझ्या अंगणात धावत येऊन मला धक्का देऊन खाली पडले व हातानी लातानी बुक्यांनी बेदम मारहाण केली मदतीसाठी आरडाओरडा करू लागली  तेव्हा घराशेजारील विद्या कामडी राजाराम कामडी आणि संघमित्रा विनोद पेठकर यांनी लगेच धावून येत त्यांनी रुपेश ला खिचत नेत सोडविले मात्र विद्या कामडी इलाही अश्लील शब्दात बोलत मारहाण केली यात मंजुशाचे वस्त्र फाटले जर पती सूर्यभान कामडी घरी आल्यावर  त्यांना झालेला प्रकार सांगताच चिमूर पोलिस गाठुन तक्रार दिली लगेच चिमुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी त्वरीत दखल घेत रुपेश शेंडे वर भ द वि  कलम 354,294,323,504,506, नुसार गुन्हा दाखल करीत अटक केली परंतु आरोपी हा शारीरिक अशक्त असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला शशक्त होईपर्यंत उपचारासाठी दाखल करण्याची विनंती केल्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधित कारवाई करून उपचार सुरू आहे लगेच दोन ते तीन दिवसानंतर अटक करून न्यालायात हजर करण्यात येईल असे पोलिस विभागाने सांगितले आहे पुढील तपास उपनिरीक्षक राजू गायकवाड  करीत आहेत,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler