कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांन कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांन कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन


चंद्रपूर प्रतिनिधी

प्रवीण वाघे


चिमूर - श्री सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय केसलवाडा (वाघ) ता.लाखनी जि. भंडारा  येथे शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत ओंकार कोवे , मेजय मेश्राम ,अमित डाहूले, पियुष रंदये , पुष्कर रंदये यांनी विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पादकते सोबतच उत्पन्न वाढ झाली पाहिजे,तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा दर्जा उंचावला पाहिजे म्हणून कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कपाशीवर बोंडअळया, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. नुकसानीचा प्रकार व एकात्मिक व्यवस्थापनाच्या बाबी समजावून घेणे आवश्यक ठरते. वेळीच योग्य व्यवस्थापनाची खबरदारी घेतल्यास आपण शेंदरी बोंडअळीपासून होणा-या नुकसानीपासून आपले बहुमूल्य पीक वाचवू शकतो.चारा प्रक्रिया ,मोबाईल अँप चा वापर ,सेंद्रिय शेती ,मित्र तसेच शत्रू किडे ,बियाणांची उगवण क्षमता तपासणे अश्या अनेक विषयांवर प्रात्यक्षिके करून दाखवले.

बोगस बियाणे अनेकदा बाजारात येतात व त्यास बळीराजा बळी पडतो हे अश्या बोगस बियांनाना शेतकरी बळी जाऊ नये तसेच बियाणे कसे ओळखावे या साठी सिड्स टॅग  व त्यांचा रंग या विषयी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler