चिखली शहरात वादळी वाऱ्यामुळे ठीक ठिकाणी मोठे नुसकान आमदार श्र्वेता ताई महाले पाटील यांनी केली पाहणी
विशाल गवई प्रतिनिधी चिखली
वादळी वाऱ्यामुळे आज चिखली शहरातील माळीपुरा येथील भराड मळा येथे १५० वर्ष जुने पिंपळाचे झाड पडून घरे, ट्रॅक्टर तसेच ईतर वाहनांचा व हनुमान मंदीराचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अवचार मळा , संभाजीनगर पुंडलिक नगर व ग्रामीण भागातील इलेक्ट्रिक पोल्स पडल्याच्या, झाडे उन्मळून पडल्याच्या, अनेक नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या व घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्याची नासाडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांची माहिती प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार, मुख्याधिकारी व महावितरणचे अधिकारी यांना सोबत घेऊन तातडीने घटनास्थळीं भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी, पडलेले इलेक्ट्रिक पोल्स लवकरात लवकर पुन्हा उभे करण्यात यावेत तसेच ज्यांच्या घरात पाणी घुसून अन्न धान्याची नासाडी झाली त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
यावेळी तलाठी श्री योगेश भुसारी, तलाठी श्री गिरी, महावितरणचे श्री भुसारी ,नगरपालिकेचे श्रीअर्जुन इंगळे, श्री दिलीप इंगळे, नगरसेवक श्री सुदर्शन खरात, श्री विजय वाळेकर श्री परवेज जमादार, श्री विलास घोलप, श्री सचिन कुलवंत इत्यादी उपस्थित होते.
