कु.कुमुद लोखंडे या विद्यार्थिनीचे दहावीच्या परीक्षेत सुयश.

 कु. कुमुद लोखंडे या विद्यार्थीनीचे दहावीच्या परिक्षेत सुयश.

चिखली | मेघा जाधव





चिखली : चिखली येथील दै. सिटीन्यूज सुपरफास्टचे बुलडाणा जि प्रतीनीधी राजेश लोखंडे पाटील यांची एकुलती कन्या कु. कुमुद राजेश लोखंडे हि राधाबाई खेडेकर विद्यालयाची विद्यार्थीनी असून तिने यावर्षी झालेल्या दहावीच्या शालांत परीक्षेत ८७.८८% गुण प्राप्त करीत सुयश संपादन केले. राधाबाई खेडेकर या विद्यालयात शिकणाऱ्या कु. कुमुदने मिळविलेल्या  या  यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, कुमुदने आपल्या यशाचे श्रेय तीने आई, वडिल, व शिक्षक वृंदांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler