शिंदी येथील आरोग्य ऊपकेंद्रात पि.टी.एल महीलेचा सर्प दंशाने म्रूत्यु

 शिंदी येथील आरोग्य ऊपकेंद्रात पि.टी.एल महीलेचा सर्प दंशाने म्रूत्यु

तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे

तालुक्यातील मौजे शिंदी येथील आरोग्य ऊपकेंद्रात 15ते20 वर्षापासून पि.टी.एल.पदावर कार्यरत असलेल्या स्व.गिताबाई बुरकूल यांनी 8जुनला सकाळी11:30च्या दरम्यान प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र शिंदी येथील प्रांगणात असलेला विटांचा ढिग ऊचलत असतांना सर्पाने दंश केला आणि त्वरीत आजु बाजुचे नागरिक गिताबाईच्या मदतीसाठी धावून आले आणि सापाचा शोध घेवून त्याला जागच्या जागीच मारण्यात आले तसेच साप आणि गिताबाईला आरोग्य केद्र साखरखेर्ङा या ठिकाणी रेफर करण्यात आले तिथेही कोणत्याच प्रकारची सुविधा नसल्यामुळे तिथुन बुलडाणा येथे रेफर करण्यात आले परंतु गिताबाईचा8जुनलाच ऊपचारा दरम्यान म्रूत्यु झाला.या कोरोणा महामारी मध्ये ऊत्क्रूष्ट सेवा देत असतांना नियतीने त्यांच्यावर घाला घातला की,त्यामुळे नियतीसुद्या क्रुर झाली आहे असे म्हणावे लागेल.गिताबाई 45 वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चाच एकुलता एकलचं योगेश मुलगा आहे.गिताबाईंचा स्वभाव अतिशय प्रेमळपणा,प्रामाणिकपणा,चांगुलपणा हे अतिशय महत्वाचे गुण गिताबाईंनी अंगिकारले होते.त्यांच्या या आठवणी शिंदी परिवाराच्या  तसेच प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांच्या मनामध्ये सतत दरवळत राहतील अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आहे.गिताबाईनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपुलकीचं स्थान निर्माण केले होते.प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्रातल्या प्रांगणामध्ये फुलांची रोप लावून त्यांना पाणी घालुन परिसर अगदी निसर्गरम्य केले आहे .गिताबाई  दररोज परिसरातील स्वच्छता करून ठेवायची.गिता बाईच्या जाण्यानं अख्य शिंदी गाव रडल.गावावरचं जणु काही दु:खाचा डोंगरचं कोसळा असे चिञ गावात निर्माण झाले आहे.गिताबाईच्या जाण्यांन गिताबाईचा लाडका योगेश अगदी मायेने पोरका झाला आहे.प्रमेश्वर योगेशला या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो अशा भावना प्रत्येकाने प्रमेश्वराच्या चरणी व्यक्त केल्या आहे.योगेशला शासनाकडून भरीव मदत मिळावी तसेच प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र केंद्र शिंदी त्याच्या आईच्या जागेवर त्याची नियुक्ती करण्यात यावी कारण योगेश आता पोरका झाला आहे त्याकरीता शासनाने तातडीने योगेशवर निर्णय घ्यावा अशी शिंदी येथील ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler