शेतकय्रांनी कर्ज माफी होईलचं या आशेवर राहु नये: अन्न औषध प्रशासन मंञी डाॅ.राजेंद्र शिंगणे
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा:समाधान बंगाळे
सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आले होते.त्यावेळी त्यांनी विधान केले की,शेतकऱ्यांनी कर्ज माफी होईलच या आशेवर राहू नये, महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र मध्ये स्थापन झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती हे कर्जमाफी जाहीर करत असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा दोन लाखापर्यंत ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. आणि ही रक्कम जमा करत असताना कोरोना चे संकट देशासह महाराष्ट्रावर आले होते या कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आणि अनेक उत्पन्नाचे मार्ग मागील दिड ते दोन वर्षांमध्ये बंद आहे. राज्याच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई घट निर्माण झाली आहे त्यामध्येच केंद्राकडून जीएसटी च्या रक्कम सुद्धा मिळालेली नाही त्यामुळे राज्यांमध्ये आर्थिक टंचाई निर्माण झाल्यामुळे आपण राज्य सरकारची इच्छा असतानासुद्धा शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत चे कर्ज माफी मंजूर केली होती ती पूर्णपणे देऊ शकलो नाही. राज्याच्या आर्थिक परिस्थिती चांगली कर्ज माफी करण्यात येईल.परंतु सद्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल त्यामुळे बँकेचे कर्ज भरायचे नाही थकीत राहायचे या मानसिकतेमध्ये शेतकऱ्यांनी राहू नये.याही परिस्थितीमध्ये याही परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी कर्जमाफी होईल या आशेवर आहेत ते कर्ज भरत नाही त्यामुळे ते कर्ज घेण्यासाठी पात्र होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्हयातील २२ ते २४ हजार शेतकरी कर्ज मुक्ती पासुन वंचित आहे.अशा शेतकऱ्यांना सुध्दा बॅंकेने पीक कर्ज देण्यात यावे. यासह अनेक सूचना मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.बँकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गांवामध्ये जावून तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहाय्यक यांनी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.बँकेचे कर्मचारी कमी असल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांवर ताण असल्यामुळे त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बँके कडे पीक कर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पोच पावती देणे आवश्यक आहे. प्रत्येक बँकेने दर्शनी भागात कर्जासाठी लागणारे कागदपत्रांची यादी लावण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत.यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण कथने पीआरपो संतोष लोखंडे, संभाजी आप्पा पेटकर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
