खेमजई गावाचा दशवार्षिक आरखडा सूक्ष्म नियोजन प्रक्रियेद्वारे पूर्ण.....

 खेमजई गावाचा दशवार्षिक आरखडा सूक्ष्म नियोजन प्रक्रियेद्वारे पूर्ण.....




वरोरा तालुका प्रतिनिधी

राकेश भूतकर

मो.न.8308264808

 

मनरेगा विभागाचा स्तुत्य उपक्रम....


विविध शासकीय विभाग व ग्रामस्थांचा सहभाग.....

 

वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळच असलेल्या खेमजई या गावाची निवड करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत गावाचा दशवार्षिक आराखडा दिनाक २६ ते २९ एप्रिल २०२२ या कालावधीत लोकसहभागातून सूक्ष्म नियोजन प्रक्रियेद्वारे २१ कोटी ४८ लाख २८ हजार ६८१ रुपये किमतीचा आरखाडा तयार करण्यात आला.  सदर प्रक्रियेचे उद्घाटन दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनिषा चौधरी तसेच मंचावर गट विकास अधिकारी राजेश राठोड,सहाय्यक गटविकास अधिकारी संजय वानखडे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक देविदास रोहणकर, विस्तार अधिकारी अरुण चनफने, माधुरी येरमे, उपसरपंच चंद्रदास  मोरे,मंडळ अधिकारी काळे, विश्वनाथ तूरानकर पोलीस पाटिल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  मनरेगा योजना अंतर्गत गावातील शेतकरी,शेतमजूर,भूमिहीन व व्यवसायीक कुटुंबाला लखपती करणे,गाव समृद्ध करण्याच्या उद्देशाने गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण,गाव फेरी, शिवारफेरी,गाव बैठक इत्यादी माध्यमातून गावाचा अभ्यास करण्यात आला. त्या प्रक्रियेत नरेगा कर्मचारी, कृषी सहाय्यक, तलाठी,वनरक्षक,ग्रामसेवक, शाखा अभियंता,अंगणवाडी सेविका, शिक्षक, उमेद स्वयं सहाय्यता समूह महिला,स्थानिक सामाजिक संस्था प्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या मदतीने राबविण्यात आला.सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची नियोजन बैठक घेऊन ४ दिवसाचे प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले.त्यानुसार प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण,गाव फेरी,शिवारफेरी करण्यात आली त्या माध्यमातून गावातील सद्यस्थितीचा अभ्यास करण्यात आला.रात्रीच्या वेळी दिनांक २७ .४. २०२२ रोजी गावकऱ्यांना मनरेगा अंतर्गत तालुक्यातील परसोडा व मजरा आणि राज्यातील उत्कृष्ट यशोगाथा चित्रफितीद्वारे दाखविण्यात आल्या.गावातील शिवार,जंगल तलाव,नाले, शेती, शेत रस्ते, शाळा,अंगणवाडी, गावातील रस्ते,मूलभूत सुविधा इत्यादी बाबत माहिती घेऊन दशवार्षिक आराखड्या मध्ये सार्वजनिक व वैयक्तिक लाभ स्वरूपाचे कामे घेण्यात आली. प्रक्रियेसाठी तज्ञ मार्गदर्शक सुनीता भोगेकर,सुरज भैसारे,ताराचंद कुमरे,अरविंद दानव,सचिन हेडाऊ,जागेश्वर नागोसे व ग्राम सेवक येंचलवार, पंचायत,कृषी,पशु संवर्धन विभागाचे अधिकारी,सामजिक वनीकरण,अरूण चौधरी व उमेद तालुका टीम,ग्राम रोजगार सेवक रवींद्र रणदिवे,दिलीप तुमसरे,मोहन पारशे,किशोर मडावी,विजय क्षीरसागर,लता वैद्य,मंगला टेकाम इत्यादी सरपंच  व उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य,तेजस्विनी ग्रामसंघ अध्यक्ष वंदना साळवे व सर्व सदस्य,सी आर पी माधुरी चौधरी, पशु सखी चिकाटे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक व शिक्षक,आशा वर्कर इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler