धक्कादायक:- नेरी येथील 75 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांनी तलावाच्या पायथ्याशी गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा
प्रतिनिधी नेरी। प्रवीन वाघे,
नेरी येथील वृद्ध शेतकऱ्यांनी आज दि 5 मेला पहाटेच्या सुमारास आजारपणाला कंटाळुन स्वतःला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली
सविस्तर असे की नेरी येथील वृद्ध शेतकरी नामे गोपाळा पिसे वय अंदाजे 75 वर्षे हे पहाटेच्या सुमारास गावाला लागून असलेल्या तलावात नेहमीप्रमाणे शैचास गेले होते परंतु बराच वेळ झाला तरी परत आले तेव्हा सकाळ झाल्यावर नागरिक जागे झाले तेव्हा नागरिकांना तलावाच्या पाळीवर असलेल्या बाभळीच्या झाडावर कुणीतरी लटकलेल्या अवस्थेत दिसले काही नागरिकांनी तिथे जाऊन पाहिले असता त्यांना वृद्ध गोपाळ पिसे हे फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसले त्यांनी ही वार्ता तात्काळ घरच्यांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठले यानंतर पोलिसांना कळविण्यात आले माहिती मिळताच चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पीएसआय शेख साहेब आणि त्यांच्या चमुनी पंचनामा करून प्रेत उत्तरणीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले सदर वृद्ध शेतकरी हे नेहमीच्या आजारपणा ला कंटाळले होते नेहमी नेहमी डाँकटर कडे जाऊन आणि औषध घेऊन वैतागले होते या नेहमीच्या त्रासाने त्यांनी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत असून त्यांचा मागे दोन मुले नातवंड असा बराच मोटा परिवार आहे
