पालक मंत्री डाॅ. राजेंद्रजी शिंगणे यांना निवेदन देताना जिल्ह्याचेभाजपा शहर अध्यक्ष कैलास राऊत

   पालक मंत्री डाॅ. राजेंद्रजी शिंगणे यांना निवेदन देताना जिल्ह्याचेभाजपा शहर अध्यक्ष कैलास  राऊत


 तालुका प्रतिनिधी सिंदखेड राजा: समाधान बंगाले




 देऊळगाव मही येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष कैलास राऊत यांनी अन्न औषध प्रशासन मंञी तथा पालकमंञी डाॅ.राजेंद्रजी शिंगणे

यांना निवेदन दिले असता त्यांनी देऊळगाव महीत लवकर बसस्थानक करणार असे आश्वासन दिले . देऊळगाव मही ही मोठी बाजारपेठ आहे आणि 100 खेडे गावांचा संपर्क या बाजारपेठेत आहे त्यांमुळे महीला व पुरुष खरेदीसाठी येतात या जनतेची आजपर्यंत ग्रामपंचायतने आपल्या सोईसाठी उपाय योजना केल्या नाही.

खरेदीसाठी येणारे लोकांना प्रवासी निवारा व मुत्री घराची सोय करण्यात यावी..

 सर्वांना माहीत आहे मी कैलास  राऊत जवळपास पाच वर्षापासून बस स्थानक साठी सर्वच लोकांकडे मागणी मांडत आहे आहे

जोपर्यंत देऊळगाव माहित बसस्थानक होणार नाही तोपर्यंत माझा लढा  चालूच होता व चालूच राहील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला खात्री आहे या ठिकाणी लवकरात लवकर बसस्थानक होईल बस स्थानक न झाल्यास माझा लढा थांबणार नाही...अधीक त्रिव करण्यात येईल १५ दीवसात न झाल्यास उपोषणाला सुरुवात करण्यात येणार येईलअशी माहिती कैलास  राऊत यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler