डोमा आविका सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी दशरथ नंन्नावरे तर उपाध्यक्षपदी मनोज गावंडे यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी नेरी-प्रवीन वाघे
मो,7038115037
चिमूर तालुक्यातील डोमा (मुक्ताई) येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून दशरथ ननावरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून मनोज गावंडे यांची बिनविरोध निवड दि 22 ला संस्थेच्या कार्यालयात करण्यात आली.
अत्यंत चुरशीची निवडणूक असलेल्या डोमा आदिवासी सहकारी संस्थेची निवडणूक दि. 2 जून ला पार पडली यात दशरथ नंननावरे व मनोज गावंडे यांच्या गटाने 13 च्या 13 ही जागावर विजय प्राप्त केला. या नवनिर्वाचित संचालकांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया बुधवार दि. 22/06/2022 ला दु. 12 वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यात अध्यक्ष म्हणून दशरथ नंनावरे तर उपाध्यक्ष म्हणून मनोज गावंडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक व पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व पुष्पहार घालून स्वागत कऱण्यात आले. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक प्रफुलजी मालके, हरिभाऊजी सातपुते, रमेशजी बावनकर, शंकरजी भरडे, आनंदरावजी गरमळे, नामदेवजी चौधरी, भाऊरावजी शेंडे, सखारामजी सावसाकडे, तुळशीरामजी नन्नावरे, सौ. शशिकलाबाई श्रीरामे, सौ. सायत्राबाई चौधरी, असे सर्व संचालक तथा संस्थेचे व्यवस्थापक पंकज रणदिवे, लिपिक दयाराम भरडे, निवडणूक निर्णय अधिकारी अवझे, सहाय्यक अधिकारी पेठे, तथा मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.