तेलगंना मधील भाजपा आमदार राजा सिंग वर गुन्हा दाखल करा.

 तेलगंना मधील भाजपा आमदार राजा सिंग वर गुन्हा दाखल करा.

मुस्लिम बांधवासह युवकांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन.



पाटोदा(शेख महेशर):- तेलगंना राज्यातील भाजपाचे आमदार राजा सिंग यांनी प्रेषित मोहम्मंद पैंगबर यांच्या बाबतीत खालच्या स्तराची भाषा वापरलेली असुन मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत,या मुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. व गोधरा हत्याकांडच्या वेळेस बिल्कीस बानो यांच्या वर बलात्कार करणारे आरोपी यांना जन्मठेप होऊन देखील त्यांना सोडण्यात आले आहे या गंभीर बाबीचा जाहिर निषेध व तात्काळ संबधीत सोडलेल्या आरोपींना पुन्हा सजा देण्यात यावी,व सदरील बिल्कीस बानो यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन पाटोदा येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.

वरील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तेलंगना राज्यातील भाजपा पक्षाचे आमदार राजा सिंग यानी पुन्हा नुपूर शर्मा सारखी वाचाळ भाषा करत प्रेषित मोहम्मंद पैंगबर यांच्या विषयी खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले आहे. या मुळे तमाम मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. सदरचा व्यक्ती हा देशामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आशा भाषा बोलत आहेत, तरी आशा जातीवादी प्रवृत्तीवर योग्य कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावे. व योग्य प्रकारची शिक्षा यांना देण्यात यावी,म्हणजे पुन्हा असे लोक वाचाळ बोलणार नाहीत व देशाची प्रतिमा मलीन होणार नाही तसेच गोधरा हत्याकांड च्या वेळेस बिल्कीस बानो यांच्या वर बलात्कार करणारे आरोपी यांना जन्मठेप होऊन देखील सोडण्यात आलेले आहे. या गंभीर बाबीचा देखील जाहिर निषेध व तात्काळ संबधीत सोडलेल्या आरोपीना पुन्हा सजा देण्यात यावी,व सदरील बिल्कीस बानो यांना संरक्षण देण्यात यावे. असे या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अँड. जब्बार पठाण, उमर चाऊस, शेख इम्रान नुर (शहराध्यक्ष राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष), नगरसेवक आसिफ सौदागर, तबलीक जमातचे अमीर शेख अमानुल्लाह सहाब, सय्यद वहाब, सय्यद शफी भाई, शेख जव्वाद बिल्डर, सय्यद शफीक अक्रम भाई, शेख बाबुलाल, सय्यद जहीर, पठाण शाहरूख, शेख समीर, शेख मोहिद, शेख हमीद, शेख जब्बार, शेख रिजवान, पठाण शहेबाज, शेख वसीम, इलियास सिध्दीकी, शेख अफसर, शेख खालेद, शेख नासेर, यांच्या सह बहुसंख्य मुस्लिम बांधवांच्या व युवकांच्या सह्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler