शेगाव बू येथे बैल पोळा उत्साहात साजरा....
चंद्रपूर जिल्हा संपादक
राकेश भूतकर
मो. न.8308264808
पोळा हा बैलांचा सण आहे. गेल्या अनेक दिवसांची परंपरा शेतकऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. श्रावण महिन्याच्या अंतिम टप्प्यात किंवा भाद्रपद महिन्याच्या सुरवातीला हा उत्सव पार पडतो. वर्ष शेतामध्ये राबणाऱ्या आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सखा असणाऱ्या बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदामळणी केली जाते. बैलांच्या खांद्यावर वर्षभर ओझे असते तो खांदा मळला जातो.पोळा हा बैलाचा सन असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह मात्र जोमात होता.गेल्या दोन वर्ष या सनवराही कोरोनाचे सावट होते.तरीपण ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सोडाच पण साधा साज श्रूगारही केला गेला नव्हता.यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे मात्र, नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांची पाठ ही सोडलेली नाही.खरीप हगामातील पिकांचा पेरा होताच सुरू झालेले संकट अद्यापही कायम आहे.असे असले तरी शेतकऱ्यांनी या सर्व संकटाला बाजूला सारून पोळा सण उत्साहात साजरा केला. बैलांचे सजावट व त्यांना क्रमांक देऊन बक्षिसांचे आयोजन मार्केट लाईन शेगाव येथील व्यापारी मनोज बोंदगुलवार, विशाल कोटकर, त्रिशूल बोंदगुलवार, संजय लेडांगे,मेहर साडी सेंटर, दिव्य कलेक्शन, कवडू तुळसकर यांच्या तर्फे बक्षिसाचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठित मान्यवर तुळशीराम घोडमारे, विनोद कोटकर, गौरव लूच्चे, राकेश भुतकर, संजय घोडमारे, वैभव पद्मावर, राजू राऊत, चंद्रशेखर कापटे, मधुकर नरड, विनोद राऊत,यांच्या तर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक सुंदर सजावट बैलजोडी मनोज हरी दडमल द्वितीय क्रमांक पांडुरंग घोडमारे तृतीय क्रमांक भूषण घोरपडे तसेच प्रोत्साहन बक्षीस सुरेश घोडमारे यांना देण्यात आले.या कार्य क्रमाकरिता शेगाव वाशी व्यापारी वर्ग यांनी सहकार्य केले व महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष गजानन ठाकरे यांच्या तर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला व बैलपोळा हा सुखरूप पार पडला यामधे शेगाव पोलीस स्टेशन यांनी सुध्दा मोलाचे योगदान दिले.ग्रामपंचायत सरपंच सिद्धार्थ पाटील आणि उपसरपंच साधनाताई मानकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते....

