चारगाव धरण फिरायला गेलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यु....
चंद्रपूर जिल्हा संपादक पद
राकेश भूतकर
मो. न.8308264808
शेगाव बू येथून जवळच असलेल्या चारगाव येथे आज दिनांक २५/८/२०२२ रोजी गुरुवारला दुपारच्या सुमारास दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.पोळ्या निमित्त कॉलेज ला सुट्टी असल्याने फिरण्याचे औचित्य साधून ते चारगाव धरण बघायला गेले होते. धरण बघत असताना मनमोहक छायाचित्रे काढण्यात मग्न असतांना . हार्दिक विनायक गुळघाने वय १९ वर्ष हा पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला व त्याला वाचविण्यासाठी आयुष श्रीकृष्ण चिडे वय १९ वर्ष हा सुध्दा पाण्यात पडला व दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशन शेगाव बू चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी घटना स्थळ गाठून दोन्ही मृतदेह पाण्याचा बाहेर काढले व मृतदेह ताब्यात घेऊन मोका पंचनामा करून त्यांना शवविच्छेदन करण्या करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आले......
