दारू च्या नशेत विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या....
चंद्रपूर जिल्हा संपादक
राकेश भूतकर
मो. न.8308264808
शेगाव बू येथील रहिवाशी प्रवीण रमेश निमजे वय ३६ वर्षे रा. शेगाव बू याने दारूच्या नशेत गावातील ग्रामपंचायत च्या पिण्याच्या पाण्याचा विहिरीत रात्रौ दरम्यान उडी मारून आत्महत्या केली.सदर युवक हा शेगाव येथील रहिवासी असुन कॅनरा बँक नागपूरला सरकारी नोकरीला होता.त्याने तिन वर्षापासून नोकरी सोडून गावातच वास्तव्याला होता. दारु पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याचे लग्न झाले नव्हते.नेहमी दारू पित असल्याने त्याची नोकरीसुध्दा ९ महिन्यापूर्वी सुटली होती.त्याच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे त्याच्या घरचे लोक सुद्धा कंटाळले होते. काल रात्री अचानक तो घरून निघून गेल्याने घरच्यांनी त्याचा इतरत्र शोध घेतला परंतु त्याचा काही पत्ता लागला नाही.अखेर आज सकाळी घराजवळून काही अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत च्या पिण्याच्या पाण्याचा विहिरीत अज्ञान व्यक्तीने उडी घेतली असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिस यांना माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सदर इसम हा प्रविण असल्याची खात्री झाल्यानंतर मोका पंचनामा करून कलम १७४ जा.फौ. अन्वये नोंद करून बॉडीला शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आले.पुढील तपास ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे....