राहुल दत्तात्रय इंगळे एअरफोर्स सैनिक वय 23 वर्षे कर्तव्यावर असताना दिल्ली येथे वीर मरण आले.

 भिमराव चाटे शहर प्रतिनिधी


 चिखली जवळील भालगाव चे 

राहुल दत्तात्रय इंगळे एअरफोर्स जवानाला कर्तव्यावर वीर मरण 23 जूनला अंत्यविधी.


राहुल दत्तात्रय इंगळे एअरफोर्स सैनिक वय 23 वर्षे कर्तव्यावर असताना दिल्ली येथे वीर मरण आले.





मूळचे शेलू चे गरीब परिवारातील भूमिहीन कुटुंब वीस-बावीस वर्षांपूर्वी भालगाव येथे मामा श्रीधर अंबरसिंग परिहार माजी सैनिक यांच्या आश्रयास येऊन वास्तव्य करू लागले. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या भूमिहीन परिवाराला राहुलने मामा सारखेच सैनिक व्हायचे स्वप्न उराशी बाळगून भारत मातेची सेवा करण्याचे ध्येय ठेवून खूप परिश्रम घेतले.


श्री दत्तात्रेय प्रल्हाद इंगळे यांना एक मुलगा राहुल हा फिजिकल फिटनेस मध्ये तंदुरुस्त प्रत्येक वेळी स्पर्धा जिंकायचा पुरस्कार घरी आणायचा.


 प्रत्येक काम शौर्याने करायचा खूप मेहनत करून एअर फोर्स मध्ये भरती झाला होता त्याला पाठीमागे एकुलती एक वीस वर्षाची बहीण रुपाली आहे ,आई सुमन दत्तात्रय इंगळे वय 42 यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व नातेवाईकांकडून थोडी- कुणकुण लागली व अत्यवस्थ झाल्या सध्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत ,


 सैनिकाचे पार्थिव दिल्ली वरुन विमानाने औरंगाबाद येत आहे 23 जूनला सकाळीच जालना देऊळगाव राजा वरुण चिखलीला बाय रोड जाणार आहे .देऊळगाव राजा बस स्थानकापासून ते अमर जवान स्मारक चिखली रोड नगरपालिका पर्यंत श्रद्धांजली देण्यात येईल.


 पावसाच्या हवामानानुसार बदल झाल्यास  शहीदा चे मामा श्रीधर अंबरसिंग परिहार माजी सैनिक भीमराव चाटे  चर्चा करून सोशल मीडिया व्हाट्सअप वर बदल झाल्यास कळवतील असे सैनिक मित्रांनी सांगितले .जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड सहाय्यक अधिकारी भास्कर पडघान साहेब शासकीय स्तरावर विचारपूस करून माहिती देत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व संघटना आर्मी नेव्ही एअरफोर्स सैनिक संघटना माजी सैनिक संघटना पॅरा मिलिटरी सैनिक असोसिएशन यांनी एकमेकाच्या संपर्कात रहावे. जय हिंद

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler