विपरीत परिस्थितीत पायल ने मिळविले ९५ % गुण

 विपरीत परिस्थितीत पायल ने मिळविले ९५ % गुण






मुन्ना ठाकूर विशेष प्रतिनिधी बुलढाणा

स्थानिक सावतामाळी नगर  भागतील  पायल गजानन  झोरे हिने विपरीत परिस्तिथीवर मात करीत १० वी शालांत परीक्षेत ९५ %गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवीले आहे

स्थानिक मुनिसिपल श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी पायल गजानन झोरे हिच्या  वडीलांचे दोन वर्षांपूर्वी अकाली निधन झाले, व झोरे कुटुंबीयांचा आधार हरवला, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पायल ची आई शेतात मजुरी करून करू लागली अशात पायल च्या शिक्षणाचा खर्च अशा बिकट परिस्थितीवर मात करीत पायल हिने अथक परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास व शिक्षकांचे मार्गदर्शन प्राप्त करून म्यु. शिवाजी हायस्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला व ९५ % गुण प्राप्त करून आपल्या आईचे स्वप्न साकार केले.पायलच्या या कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून ह्या यशाचे श्रेय तिने आपल्या आई व शिक्षकांना दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler