वाघांच्या हल्ल्यात गाय आणि गोरा ठार...
वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी
राकेश भूतकर मो.न.8308264808
शेगाव बु येथील शेगाव शेत शिवारातील वाघाच्या हल्ल्यात गाय आणि गोरा ठार झाले.असून ही घटना विनोद देवराव राऊत यांच्या शेतातील रात्रीच्या सुमारास घडली असून या अगोदर सुद्धा महालगाव शेतशिवारातील शेळीची सुद्धा वाघाने शिकार केली होती त्याचबरोबर काल रात्री घडलेल्या हल्ल्यामुळे या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या मृत गाईच्या आणि गोऱ्याच्या शेजारी वाघाचे पंजे दिसून आल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या रब्बी पिकाचे हंगाम सुरू असून शेतात पिकाला पाणी करणे फवारणी करणे हे हंगाम सुरू असून या वाघाच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गावातील नागरिकांनी वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या गाय व गोऱ्याची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि व वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करण्याची सुद्धा मागणी केली आहे .यावेळी वनविभागाचे कर्मचारी किशोर देऊळकर, वनरक्षक लडके साहेब सोबतीला वन-विभाग कामगार स्वप्नील बदकी, अमोल गायकवाड, राहुल पातूरकर,रंजित गजभे मोका पंचनामा करताना उपस्थित होते....